सःदेवः मःदेवः . . .

काही वेळापूर्वीच बेळगांवच्या मिलिटरी महादेवांचे देऊळ दर्शन घेऊन परतलो… कुठे? शोधा पाहू… आमच्या मते आम्ही अजून तिकडेच असणार… ऑ…, मग लिहितेय ते नक्की कोण?

म्हणजे येडियुरप्पांच्या पप्पांच्या बेळगावी जाऊन आलो असे म्हंटले तरी चालेल बरं का…. फार आग्रह होता सोबतच्या मंडळींचा की जरा जास्त वेळ विश्रांती घ्या येथेच म्हणून… त्यांना आमची अवघड जागेची दुखणी कशी कळणार, म्हणून हळूच सटकलो काहीतरी कांगावा करून…

पण…. वाटेत पुणे – कोल्हापुर रस्त्यावरच्या येडेनिपाणीचा कझिन निप्पाणीचे मुद्रण मराठीत नीपाणी असे केलेले सुद्धीक पाहिले… आणि हो त्या निप्पाणीचा उच्चार मात्र लिप्पाणी असाच करायचा असतो असा शिरस्ता आहे… तदनुषंगाने बेळगावी चा उच्चार काय करायचा? हा प्रश्न अजुनही अनुत्तरीतच ठरतो… अजून काही शंका असल्यास नक्की कळविणे, मु. पो. निशाणगंज, अंमलविरहित ठाणेदार!

कन्नडिंगांना एक सप्रेम सूचना, तेवडे, देवनागरी सुद्धलेखनाचे बगा काय जमले तर…. आम्ही कन्नड भरता इल्ला पासून शिक्षणाची ऋजवात घातलीच आहे…..

हिरवादिवा…

५-७ वर्षापूर्वींची गोष्ट आहे… आमच्या नेहमीच्या १ वॉटचे (अनेक लाईट एमिटिंग डायोडचा गुच्छ असलेले) दिवे खरेदी करायच्या दुकानात गेलो होतो… नेहमीप्रमाणे शुभ्र नाईट लँपची चोकशी केली, तेव्हा तेथील बाई-माई-ताई म्हणाल्या ते दिवे संपले आहेत… म्हंटले असे कसे काय? कधी येतील… तेव्हा म्हणाल्या आत्ता हिरवे दिवे खूप पडून आहेत, ते कोणीच घेत नाही… त्यामुळे शुभ्र दिवे काही लगेच आणणार नाही…

क्षणभर विचार करून म्हंटले द्या २-३ हिरवे दिवेच… काय फरक पडतो हो देवासामोरी हिरवा दिवा लावला तर…? तर असे हे २-३ हिरवे दिवे आमच्या घरात रात्रपाळीची ड्युटी आजवर निवांत करत होते… आजवर असे मी गेल्या १५-२० दिवसांपर्यंत म्हणू शकतो, आता नाही…

का?… अहो चक्क देवाजवळच्या दिव्याने हिरवा रंग टाकून शुभ्र रंग धारण केला त्याला काय म्हणायचे आता? तर आपली रंगांधता ही इतकी शुभ्र असते की आपल्याला देवाजवळ हिरवा दिवा चालत नाही, काळे कपडे घालून केलेल सत्कृत्य देखिल चालत नाही… मात्र शुभ्र कपडे घालून केलेले अत्याचार, भ्रष्टाचार, काळी कृत्ये चालतात..

तर त्या अनुषंगाने आजचा शब्द आहे श्या-मे-लिऑन. अगदी सनी-लिओन इ-स्टाईल… तर पुढच्या वेळेस जर-यदा-कदाचित-अमेरिकेला जायची वेळ आली तर आम्ही मात्र-केवळ अंगावरच्या कापड्यानिशी तिकडे जायचे, कोणतेही स्पेअर कपडे न्यायचे नाहीत असे योजले आहे… अहो कारण अगदी साधेच आहे… नाटकातील प्रवेश हा उत्तमच हवा ना? म्हणून… गरज वाटल्यास तिकडेच भिक्षा मागून पैसे जमवून, नवीन कपडे खरेदी करणार अन्यथा तसेच एकवस्त्री प्रयोग दर्रोज सादर होणार… नाहीतरी पाश्चिमात्यांनी जगभर बाथरुम बांधूनच टाकल्या आहेत… काय गरज आहे हो तिथल्या एखाद्या निळ्याशार तळ्याकाठी गार पाण्याने (स्वतःला) आंघोळ घालायची. प्रदुषण सुद्धा कसे अगदी चॅनेलाईझ करायचे असते, नळा-नळातून…. मग ते घाण पाणी एकत्र करून त्यावर प्रोसेसिंग, काय कोण सिंग, देऊ का कानाखाली अजून एक? त्याचे पुनर्शुद्धिकरण करून त्यांना त्यांच्या मूळ धर्मात स्थिर करायचे असते… अगदी भूस्थिर उपग्रहासमान…. सूर्य हा असाच एक भूस्थिर ग्रह नाहीये का? कशाला एवढा दुराग्रह धरताय? अहो, पृथ्वीचाच उपग्रह नाहीये का तो?

काय म्हणाला, अनुग्रह हवाय स्वामी? अरे इथे तर कोणीच दिसत नाही मग हू (इज) सॉमी? अगदी हाफिज स्टाईल बोललात की बो।

हा, पण जाताना बरोबर एक टॉवेल, नॅपकिन, पंचा किंवा तत्सम संबोधित अजून एक वस्त्र नक्कीच नेणार, तोंडचा कपाळाचा घाम पुसायला… कारण आमचा अवतार बघून तिथल्या एखाद्याने भरपूर मार खाल्लाच तर बॉक्सिंगच्या मॅच इ-स्टाईल तो टॉवेल रिंगणात टाकून कोणा गधड्या-ड्यी-चा जीव तरी वाचवता येईल… आणि तसेही अत्तराचा फवारा अंगभर मारून आंघोळ न करता फिरण्यापेक्षा ते नक्कीच श्रेयस्कर!

पायात चप्पल असणार का? वा, काय छान प्रश्न आहे… उत्तर नक्की कुठे लिहून-वाजवून देऊ तेवढे सांगा म्हणजे झाले…. अजून काही शंका असल्यास लघु-वा-दीर्घ, अवश्य तपासावे. शेवटी आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी….

काय कशी काय वाटली आजची लेखप्रत? प्रत? हो प्रतच, कारण मूळ कुठे आहे हे मुळी कोणाला ठावच नाय….

टिकली…

आता ही कोणताही इ-टिकल् ची जाहिरात नाही आणि कली युगातील टेक्निकली देखिल नाही… पोलिटिकली तर नाहीच नाही, आणि ऑप्टिकली कोणतेही इल्युजन सुद्धा नाही. तर आहे साधीच कथा, कौन था, नही… कौन है उसकी बात है ये….

सकाळी सकाळी निवांत बायकोच्याच भांड्यातला (वजाबाकीतला, हातचा ह्यायचे टाळून) चहा पित निवांत बसलो होतो घरच्याच आवारात… तर चष्मा न लावलेली आमची नजर अचानक थबकली, ती एका छोट्याश्या मुंगीमुळे… ती मुंगी आमच्याच घरातल्या कोणाची तरी तिथे तिला सापडलेली तांबडी टिकली घेऊन मार्गक्रमण करत होती….

आजकालच्या इ-टिकल् करणाऱ्यांचा युगात आम्हांस ती साखरेऐवजी टिकली घेवून जाणारी मुंगी ही मुक्ताबाईंच्या मुंगी उडाली आकाशातल्या शततारका नक्षत्रासमान भासली तर त्यात नवलकोल असा तो कोणता?

तिला आवर्जून सांगण्यासारखे असे काहीच नाही तरीही सांगावेसे वाटले म्हणून… त्या लाल रंगाची चुकूनही थोडीशी धुलाई केली-घडली की त्यातील मवाळ तरीही प्रखर असा केशरी रंग दिसू लागतो…

आजच्या डिजिटल युगातही लाल रंगाची इंटेन्सिटी कमी केल्यावरच के.श.ऱी. रंग मिळतो… आणावा भासतो…. म्हणजे आर्.जी.बी. च्या कक्षेत विचार करता… लाल भडक रंग आहे तसाच ठेवून, हिरव्याचे मुल्यस्फिती कमी केले असता तो (अग्निसापेक्ष) रंग मिळतो… तेथे निळ्याची मुद्रास्फिती शून्यवतच असते….

आता सी.एम्.वाय्.के. चे काय करायचे ते ज्याचे त्यानेच पहावे हे नक्की….

आमच्या सामान्यमते… वाहनांक, लेखांक, मुद्रांक, चलनांक, सदनिकांक, गृहांक, रेखांक, वगैरे वगैरे ही सर्व त्या त्या क्षेत्रसंबंधी गोष्टींचे अनुक्रमांक दाखविणारे जागृक शब्द आहेत… आर्जीबी हे सकारात्मक अर्थात मूल्यवर्धिष्णु पद्धती असून सीएम्वाय्के ही मूल्य-घट-लय-कारक अशीच रंगपद्धती आहे हे सर्व इंग्रजी भाषेतील महाजालीवर आढळतेच…

थोडक्यात काय, खिशात एकही पैसा नसताना भिक्षुक आला आणि तेव्हा देवाचा नाम घेत खिसा चाचपला असता जे सापडतात तेच खरे पैसे… बाकी सब माया है इसी जाल की… साखी ह्या शब्दाचा अर्थ तर सर्वांना खबर अशैलच… कबीरापासून गौस्वामी तुलसीदासांपर्यंत आणि त्यानंतरही सर्वांनी तोच सांगावा दिला…

झाडाखाली निवांत आराम करीत बसलेल्याला अगांतुकाने विचारले “काय रे राम आहे का काम?” (ह्या शब्दांत स्वल्पविराम कोठे टेकवायचा ते तुम्हीच ठरवा आणि करा खुदकी नींद हराम) तर त्याच्यात नसलेला तो अचानक अंगी उगवून त्या अगांतुक तिऱ्हाईताची धुलाई करितोतयाला हिरो म्हणायचे की झिरो? हे देखिल आपणच…

भजा राम विश्राम योगेश्वराचा । जपू नेमिला नेम गौरीहराचा ॥
स्वयें नीववी तापसी चंद्रमौळी । तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं ॥८५॥

गे-बाय-डीफॉल्ट….

हा शब्दभेद खरे तर गे-बायडी-(चा)-फॉल्ट असा आहे… त्या दोन बायडींनी नेपाळमध्ये येवून एक केळे खाल्ले व्हते तेंच चुकलं… त्यांना जर केळं खायचंच व्हतं तर ते नेपाळ मध्ये येवून का खाल्लं? बायडींनो आमचे इ-स्पष्ट मत सांगतो…. लेस्बियन संबंध हे दोन पुरुषांमधिल (गे) संबंधांपेक्षा जरा बरे असतात… म्हणजे ते बरोबर असे नव्हे….
शेजारी दगड आनून बसवला तरी ज्याचा स्वभाव ( आत्मभाव – आत्मलिंग ) जागृत होईल तोच खरा नारी – वा – नर…. बाकी सब है अनार (फटाके)।

अशा कोणत्याही संबंधातील नसलेला तोच खरा ब्रह्मसंबंध… अर्थात ही सर्व आमची वैयक्तीक मते म्हणून तुमी बाजूला ढकलली तरी चालेल कारण त्याच तुमच्या बाजूला कोण बसलेय ते अजून कोणी वळखले नाय… समजेल तव्वा हा जेल कोणता सम-लिंगी जेल आहे ते कळेल… हुष्षार लोक तुरुंगातून निसटायचे अनेक मार्ग शोधतात, पण हवातिनो …..

मग मित्रांनो आज तुम्ही दाढी कोणता जेल लावून केली…. कि सध्या बिन-पाण्याचीच? म्हणजे सध्या झाडाखाली चालते की रस्त्याच्या कडेला बसून? खाजवा जमेल तश्शी… नाही जमलं तरी….

अपरोक्ष…

हा झाला आजचा खास शब्द… कोणी वरचा बैल म्हणेल, तर कोणी खाल्चा बैल बनेल…. पण शेवटी अपरोक्ष म्हणजे, मालकाच्या नजरेआड (परवानगीविना) केलेले कृत्य… आता परमेश्वर जर सर्वसाक्षी, सर्वव्यापक असेल… मग तो कोणत्याही धर्माचा असो… तर त्याच्या अपरोक्ष काही करणे शक्य आहे का?

पण ह्या जगात जसे शहाणे आहेत तसे अधिक-वा-अति शहाणे सुद्धा असणारच ना? म्हणूनच म्हंण्ले जरा थांबाच… काय काय उत्तर ऐकू-पाहू आले गेल्या काही दिव७… आणि टोला देण्यासाठी काय घंटाच बसवायला पाहिजे असेही नाही… न बसवताही-वाजविताही ऐकू येते तीच खरी घंटा… आणि मग सर्वत्र शोध सुरु व्हेअर इज द लँप?….

आमचे उत्तर एकदम सोप्पे कम् फण्डू ज्यादा आहे… ओफ, ओ… आर यू नॉट?… नेक्स्ट प्लीज…!

आणि मग नकारघंटा म्हणजे काय हे जाणणे उपयुक्त असणारच ना? नाही?… ठीकाय शक्यतो सांगणारच नाऽऽऽऽऽऽऽऽऽहीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!