इंग्रजी भाषेत रेघेखाली जाणारी अक्षरे किती आणि कोणती? आणि हो त्यारेघेला ते बेसलाईन म्हणतात बरं का!
अशी ५ अक्षरे आहेत.. जी जे पी क्यू आणि वाय्
आता त्याअक्षराच्या निर्दिष्ठित जागेनुसार त्यांना ५ नेहमी स्वतंत्र असावेसे वाटणार.
तर आपल्याला भाषणस्वातंत्र्य हवे की लैगिक स्वैराचार स्वातंत्र्य? ह्यावरून माझ्या प्रश्नाचा रोख लक्षात येईल…
बाकी ज्याचे त्याने मनस्वी अधिक चिंतन करावे…
हे होते दैनिकलोणचे!
मर्यादा ही नेहमी स्वतः कोणाच्याही आग्रह वा सल्ल्याविना स्विकारलेली सीमा असते।
आणि परमेश्वराला निस्सीम भक्ती आवडते… हे कसे काय बुवा?
ह्याच अनुषंगाने भारतीयराजशिष्टाचार नांवाचे एक पुस्तक कन्याकुमारीच्या विवेकानंद आश्रमातून कधिकाळी प्रसिद्धही झाले आहे।
Category: Other, आदर, आयुर्वेद, इंग्रजी, ई-नोंदी, कानडा, काव्य, कूट, कोंकणराठी, गुजराती, तात्विक, देवनागरी, धनुर्विद, पुणेरी चपराक, महाराष्ट्रभाषा, मुद्राराक्षस, रूपकात्मक, लोकमराठी, संस्कृत, हिन्दनागरी
Leave a Comment
ह्या वर्षीचा १५ ऑगस्ट म्हणजे आमच्यासाठी खेळ मांडियेला… असाच होता…
म्हणजे दिवसाचा सारांश पाहिला तर ह्या गीतात सहजपणे सामावून जातो
इतर काही विशेष लिहिण्यासारखे नाही..
मोबाईल नसल्याने एक वेगळी शांतता अनुभवत होतो… म्हणजे त्याची रिंग न वाजणे ही शांतता आम्ही नेहमीच अनुभवतो… पण तो सोबतही नाही हे एक वेगळेच सौख्य लाभले। खरंतर बायकोला अगदी नवऱ्यासोबत सवत नसल्याचा आनंद व्हायला हवा होता पण आम्हांस तसे सांगायचा अधिकार नाही. ऑ, अधिकार नाही म्हणजे आम्ही अधिकारी नाही? … असे कोण म्हणतो? पण जेनु (ते लिनक्स वाले जी एन् यू नव्हे) काम तेनू…!
कारण आमचा शेजांऱ्यांशी आणि घरातही भारत-पाकिस्तान खेळ चालू असतो… आणि आजुबाजुला कोणी नाही सापडले की आपले आहेच की पृथ्वीचे प्रेमगीत (म्हणजे सूर्याशी खेळ)… तर वेळ छान (झकास) घालवला… आम्ही.. आणि हां, ह्या खेळातली गंमत जोपर्यंत आपण नक्की भारत की पाकिस्तान हे जाहीर करत नाही तोपर्यंतच टिकू शकते बरं का। त्यानंतर देश बदलून खेळावे लागते पुन्हा शास्त्रीय संगितातली सम लाभेपर्यंत।
केल्याने पृथ्वीटन।
Category: Linux, Other, bothटीका, आदर, आयुर्वेद, ई-नोंदी, कानडा, काव्य, कूट, कोंकणराठी, गुजराती, तात्विक, देवनागरी, धनुर्विद, पुणेरी चपराक, महाराष्ट्रभाषा, मुद्राराक्षस, रूपकात्मक, लोकमराठी, संस्कृत, हिन्दनागरी
Leave a Comment
नंदन नीलेकणींचा (पापी) पेट (का सवाल है।) प्रॉजेक्ट:= UID : Unity In Diversity (एक भारतीय घोषवाक्य)
संगणकीय जालनाळ सुरक्षाप्रणाली := SSL : Silence Speaks Louder (मुहावरा की कहावत… वगैरे काहितरी)
Category: Linux, Other, Technical, bothटीका, आदर, इंग्रजी, ई-नोंदी, कूट, तात्विक, देवनागरी, पुणेरी चपराक, महाराष्ट्रभाषा, मुद्राराक्षस, लोकमराठी, हिन्दनागरी
Leave a Comment
आम्ही काल त्या दिवशी ..जनांनी ..नोरांची वीज तोडली ह्याला अतिशय मऊशार गध्यात्मक उपमा दिली.
राजगडाच्या पद्मावती मंदिरातील वास्यावरच्या बहुलंकारिक भाषेत लिहीले तर सगळ्यांच्या तोंडचे पाणीच पळेल…
अगर महाशिवा वहाँ नही होते तो इ-सुन्नत (वीज कटिंग) के बदले तुम्हारी ही सुन्नत होती। च्यायला समद्या चोरांच्याच उलट्या बोंबा।
जरा इतिहास वाचा आणि मगच बोंबा मारा… रामा रामा रामा काय हे दिवस… आणिक काय ही शिष्य परंपरा, कुठे गेला गो-माझा-विंदा? काय एकसुद्धा शिष्य नीट तयार नाही करता आल्ला का त्याला की जो त्याची कविता समजून आणि उमजून जगू शकेल…? कसं होणार ह्या भूमीचं…
बोलावले उद्घाटनाला की निघाले अर्धा हात घेऊन… असेल हिम्मत तर पूर्णपाणि न्यायचास ना (कर हा करी धरिला शुभांगी म्हणूनी.. त्या गोविंद बल्लाळ देवलांच्या गीतानुसार)! तुमचा तो रामा गडीच खरा… म्हून धनी सुखरूप परत येईपोत्तर उगी ऱ्हायला…! असता एकांदा नवांगुर तर लगेच लावला असता तुमांला फोन आनी मंग झाला असत्या तो तुमचा कोन!
उगाच नाय तो पु.ल. इ-भट्टीतून जळाला की पळाला
त्याचे नांव पण पुसायची अक्कल होती का कोणाला त्या उंटांच्या मेळाव्याला…?
वीजमंडळ ह्या लोकांवर मंडळाची इमेज खराब केल्याचा दावा ठोकत नाही म्हणून सोकावलेत सारे… कनेक्शन कोणाच्या नांवावर आणि कोकलतोय कोण?
आम्हांला तर हा मामला वीज चोरीचाच वाटतोय…!
Category: Other, आदर, आयुर्वेद, ई-नोंदी, कोंकणराठी, तात्विक, तिबेट, पुणेरी चपराक, मुद्राराक्षस, लोकमराठी, हिन्दनागरी
Leave a Comment