मध्ये वराच काळ आम्ही स्वतःचे कपडे अंगाच्या साबणाने धुवून पाहिले पण कोणचा तो संस्कृत सुभाषित आहे त्यापरमाणे आमच्या हंडरवेअरचा रंग काही काळा झाला नाही… तसे डोक्यावरचे केसही पिवळे झाले नाहीत डोळे भगवे झाले नाहित की वस्त्र शुभ्र जाहले नाही…
अनेक लोकांच्या जीवनांत त्यांना परमेश्वर एक वेगळाच साबण देतो अशी आमची कविकल्पना आहे… की ज्याचे नांव सनलाईट अर्थात कुलदीपक!
आता तो कोणत्या स्थानावर आला तर त्याला कुलदीपक म्हणावे आणि कुठल्या स्थानावर आला तर वरवंटा म्हणावे ह्याबाबत मात्र काही खास मतप्रवाद शोधूनही नाही सापडला…
आम्हांस वाटते की सध्याच्या मुलींचीकमतरताभासलीयुगात तो ८व्या स्थानावर आला तरच तो भगवान श्रीकृष्ण गृहितावा अन्यथा वरवंटा समजून पाटावर बसवावा… म्हणजे बागायतींची शिंपणी करायला… अथवा पाट्यावर फिरवून चटणी कराया धर्मपत्नीस हालात-ए-मदत करावी… जमल्यास एखांदा नारिकेल अधून मधून वाढवून तोही हिरव्या कंच मिरच्या बरोब्बर ठेचा खाताना कोण ती चव भेटणार ह्याची हालात-ए-चिंता नसावी…
आता हे दिव्य कळायला अगोदरच्या ६~७ मुलींची नीट काळजी घ्यावी म्हणजे मुलांमध्ये नीट अंतरपाट ठेवले तर दर ३ वर्षाला १ ह्याप्रमाणे २४ वर्षे कुलदीपकाय तपस् करावे… अशी २४ वर्षे आणि २१ व्या वर्षी १८ वर्षे वयाच्या मुलीशी लगीन केलेले गृहितून तीचं वय २१ होयाची वाट पहाणे म्हणजे झाले की वयाचे ४८ साल आणि वाजलेच की बायकोचे बारा!
