Archive for the Category »रूपकात्मक «

यदा..

तो जनबंधुओं आजका दैनिकसवाल ये रहा की कल का दैनिकसवाल कौन७ था-रहें-जाये?

और परसों का दैनिकसवाल ये रहा की ये जो हम बात कर रहे है….वो बीता हुआ कल है या आऩेवाला?

सनलाईट (साबण) आणि आम्ही…

मध्ये वराच काळ आम्ही स्वतःचे कपडे अंगाच्या साबणाने धुवून पाहिले पण कोणचा तो संस्कृत सुभाषित आहे त्यापरमाणे आमच्या हंडरवेअरचा रंग काही काळा झाला नाही… तसे डोक्यावरचे केसही पिवळे झाले नाहीत डोळे भगवे झाले नाहित की वस्त्र शुभ्र जाहले नाही…

अनेक लोकांच्या जीवनांत त्यांना परमेश्वर एक वेगळाच साबण देतो अशी आमची कविकल्पना आहे… की ज्याचे नांव सनलाईट अर्थात कुलदीपक!

आता तो कोणत्या स्थानावर आला तर त्याला कुलदीपक म्हणावे आणि कुठल्या स्थानावर आला तर वरवंटा म्हणावे ह्याबाबत मात्र काही खास मतप्रवाद शोधूनही नाही सापडला…

आम्हांस वाटते की सध्याच्या मुलींचीमतरताभासलीयुगात तो ८व्या स्थानावर आला तरच तो भगवान श्रीकृष्ण गृहितावा अन्यथा वरवंटा समजून पाटावर बसवावा… म्हणजे बागायतींची शिंपणी करायला… अथवा पाट्यावर फिरवून चटणी कराया धर्मपत्नीस हालात-ए-मदत करावी… जमल्यास एखांदा नारिकेल अधून मधून वाढवून तोही हिरव्या कंच मिरच्या बरोब्बर ठेचा खाताना कोण ती चव भेटणार ह्याची हालात-ए-चिंता नसावी…

आता हे दिव्य कळायला अगोदरच्या ६~७ मुलींची नीट काळजी घ्यावी म्हणजे मुलांमध्ये नीट अंतरपाट ठेवले तर दर ३ वर्षाला १ ह्याप्रमाणे २४ वर्षे कुलदीपकाय तपस् करावे… अशी २४ वर्षे आणि २१ व्या वर्षी १८ वर्षे वयाच्या मुलीशी लगीन केलेले गृहितून तीचं वय २१ होयाची वाट पहाणे म्हणजे झाले की वयाचे ४८ साल आणि वाजलेच की बायकोचे बारा!

झेंडा…

कायहो ते रेल्वेला हिरवाच का दाखवावा लागतो…?

त्याऐवजी पिवळा, काळा किवा भगवा झेंडा का नाही दाखवत?

म्हणजे लाल हा रंग अगोदरच काम थांबवण्यासाठी वापरतात नाहीतर ते सुद्धा वापरले असते आपण…

मला तरी वाटते तिरंगा दाखवूनही ते काम करायला हरकत नाही… आता त्यासाठी तत्पूर्वी झेंडाकूट तपासायास हवे हे मात्र खरें।

पहा विचार करून म्हणजे हिरवा फुत्कार वगैरे म्हणणाऱ्यांना काही संधीच मिळणार नाही हो…।

अगदीच दुसरे काही सापडत नसेल तर कबुतराचा राखाडी रंग अर्थात पारवा रंगही धावेल…

एकनाथ महाराज नाही का कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले होते…

कारण सर्वानुमते पांडुरंग श्वानरुपात येऊन पुरणपोळी खायला पळीवली…

तर देखिला का आजका दैनिकसवाल?

आणि काय आहे की रेल्वेचे होणाऱ्या अपघाताची पुरणपोळी एकाच समाजावर भाजायासी संधी कोणाला मिळूनये हीच आमची शुभेच्छा। ती सर्व (माफ करा पण जंन्तेची असे म्हणत नाही) समाजाची सार्वत्रिक जबाबदारी असायला हवी ना..?

.
.
बळे सोडिता घाव गाजे निशाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥१२३॥
.
.
.

स्वातंत्र्य, स्वैराचार आणि मर्यादा…

इंग्रजी भाषेत रेघेखाली जाणारी अक्षरे किती आणि कोणती? आणि हो त्यारेघेला ते बेसलाईन म्हणतात बरं का!

अशी ५ अक्षरे आहेत.. जी जे पी क्यू आणि वाय्

आता त्याअक्षराच्या निर्दिष्ठित जागेनुसार त्यांना ५ नेहमी स्वतंत्र असावेसे वाटणार.

तर आपल्याला भाषणस्वातंत्र्य हवे की लैगिक स्वैराचार स्वातंत्र्य? ह्यावरून माझ्या प्रश्नाचा रोख लक्षात येईल…

बाकी ज्याचे त्याने मनस्वी अधिक चिंतन करावे…

हे होते दैनिकलोणचे!

मर्यादा ही नेहमी स्वतः कोणाच्याही आग्रह वा सल्ल्याविना स्विकारलेली सीमा असते।

आणि परमेश्वराला निस्सीम भक्ती आवडते… हे कसे काय बुवा?

ह्याच अनुषंगाने भारतीयराजशिष्टाचार नांवाचे एक पुस्तक कन्याकुमारीच्या विवेकानंद आश्रमातून कधिकाळी प्रसिद्धही झाले आहे।

बालगोपाळांची दहिहंडी…

…आणि आमची उपस्थितीत पार पडलेल्या दहिहंडीचा कथावृत्तांत असा….

बालकांचे तीन थर होते. तिसऱ्या थरावर उपस्थित एक मुलगा आणि एक मुलगी.

मुलाने प्रथम उजव्या हाताने टिपरीचे तीन तडाखे हंडीला दिले पण हंडी फुटली नाही.

मुलीने मुलाकडून डाव्या हाती टिपरी घेतली आणि तसाच पहिला तडाखा दिला. हंडी तशीच. दुसऱ्या तडाख्याला हंडी फुटून खालचा भाग सर्व बालगोपाळांच्या पासून दूर सुरक्षित अंतरावर जाऊन पडला.

मुलगी वामहस्तकुशल आहे अथवा परमेश्वराने तिथे आम्हांस ह्या कारणेन “वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा” संकेतरुप दर्शविले ह्याची विशेष नोंद तसेच दोहोंमध्ये वयानेकोण ज्येष्ठवाकनिष्ठ हेही जाणणे आवश्यक नाही कारण कार्यक्रम छान झाला.

आणि अशा रितीने बाळगोपाळांनी दहिहंडीचे विसर्जन सुरक्षले.

॥हरिः ॐ तत्सत॥