Archive for the Category »तिबेट «

यदा..

तो जनबंधुओं आजका दैनिकसवाल ये रहा की कल का दैनिकसवाल कौन७ था-रहें-जाये?

और परसों का दैनिकसवाल ये रहा की ये जो हम बात कर रहे है….वो बीता हुआ कल है या आऩेवाला?

जय होय

थोडेसे सामान्य ज्ञान पाजळायला प्रत्येकाला सोय असायास हवी लोकशाहीमध्ये आणि ठोकशाहीमध्येसुद्धा नाहीतर जीवन अगदीच निरस आणि बेचव होऊन बसायचे…

तर जय हो विषयी आमचे पाजळलेले २ शब्द…

“हो” ह्या शब्दउच्चारानुसार अमेरिकेत एक अर्थ आहे.. कारण तिकडे अनेक सामाजिक संप्रदायातील जनता त्या “हो” चा अर्थ वेश्या असाच घेतात…

अगदी सुनील गावस्करच्या ला-होर उच्चारातील “होर” ह्याचा उच्चार तेथील अनेकविध नागरिक “हो” करतात… असे असूनही त्या जय हो ला कुठलासा अमेरिकन पुरस्कार मिळाला म्हणून आम्हां काय वाईट वाटले नाय, मात्र त्या बाबतीत आम्ही १००% श्री अमिताभ आणि ५०% बच्चन यांचे बाजूनेच आहोत…

श्री दत्तात्रेयांनी मानलेले अनेकविध गुरुमध्ये वारयोशिताही एक गुरु असलेने, आम्ही तिकडे कानाडोळा केला पण अगदीच भावना अनावर वाटल्या म्हणजे आतून उकळीच फुटली वो, म्हणून ह्या विषयावर आज लेखणी टेकिवली.

त्यामुळेच २-५ वर्षापूर्वी गोवा विधानसभेतील अभूतपूर्व गोंधळातील आवाजी मतदानादरम्यान ऐकू आलेला उच्चपातळीतील एकमेव “होय” आजही आमच्च्या कानात सुखावहच ठरतो…

जय जय जय जय हे।

झेंडा…

कायहो ते रेल्वेला हिरवाच का दाखवावा लागतो…?

त्याऐवजी पिवळा, काळा किवा भगवा झेंडा का नाही दाखवत?

म्हणजे लाल हा रंग अगोदरच काम थांबवण्यासाठी वापरतात नाहीतर ते सुद्धा वापरले असते आपण…

मला तरी वाटते तिरंगा दाखवूनही ते काम करायला हरकत नाही… आता त्यासाठी तत्पूर्वी झेंडाकूट तपासायास हवे हे मात्र खरें।

पहा विचार करून म्हणजे हिरवा फुत्कार वगैरे म्हणणाऱ्यांना काही संधीच मिळणार नाही हो…।

अगदीच दुसरे काही सापडत नसेल तर कबुतराचा राखाडी रंग अर्थात पारवा रंगही धावेल…

एकनाथ महाराज नाही का कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले होते…

कारण सर्वानुमते पांडुरंग श्वानरुपात येऊन पुरणपोळी खायला पळीवली…

तर देखिला का आजका दैनिकसवाल?

आणि काय आहे की रेल्वेचे होणाऱ्या अपघाताची पुरणपोळी एकाच समाजावर भाजायासी संधी कोणाला मिळूनये हीच आमची शुभेच्छा। ती सर्व (माफ करा पण जंन्तेची असे म्हणत नाही) समाजाची सार्वत्रिक जबाबदारी असायला हवी ना..?

.
.
बळे सोडिता घाव गाजे निशाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥१२३॥
.
.
.

येरी आई पिया बिन… सखी!

म्हणजे हे कोणत्या रागाचे गाणे आहे हे आम्हांस आता ८वतही नाही पण हे कधितरी वाजवले होते अप्पासाहेब जळगांवकर चलित संयंत्रावर… म्हणजे अप्पांचे यंत्र काही आम्ही कधि वापरले नाही पण प्रकार तोच… तसेच एक यंत्र क्ष्मणकुमार पुरुषोत्तमही खेचत असत हे खूप उशिरा लक्षात आले… म्हणूनच बहुदा खेचरी नावांची मुद्रा अस्तित्वास आली… ज्यांना जास्त उष्णता जाणवते तयांनी सीतली करावी… ताबडतोब तोंडातला एअर कंडिशनर काम सुरु करतो…

तरआजकायविषेशनाहीहेसांगायचीवेळआलीहोती… पण पुण्यातील ४ दिवस संततधार रिपरिप थांबून सकाळी सकाळी सूर्यबाप्पाचे दर्शन झाले… हो देवपुजेस बसलो तर हळूच तिरीप आली डोळ्यावर मग मात्र मधिल काचपडदा दूर सारून त्याला वाट देऊन एका डोळ्यावर आरूढ होऊ दिले किरणांना… दुसरा डोळा पुढे करेपर्यंत ढगांनी पुन्हा लपंडावास सुरुवात केली मग मात्र आम्ही वि४ करून करून थकित होण्याऐवजी देवपूजेचे भाकित साग्रसंगीत सुरु केले…

आपण न रागावता आत खोलवर दडलेल्या रागाला बाहेरवाट कशी करून द्यायची? ये रहा आजका दैनिकसवाल

हाँ, आत्ता आठवले (अभ्भी याद आया?) तसे सांगायला आजही गोष्ट आहे… पण…!

ती जरा वेगळी कथा आहे…

तर ह्या धोक्याच्या वळणावर घ्या मिटींग इति शंकर पाटलांची भेदक संवादी फेकसम साधत आजचा लेख इथेच सम् आप्त।

ता.क.: आत्ता ह्या सिप्रसुद्ध शंकर पाटलांच्या बाप्पाचे नांव कंडु की खंडु हा घोळ आपण सावकाश सोडवू… म्हणजे असेल कंडू तर लिवावे खंडू घेऊनशाण।

॥गुळाचे गणपति लवकर या (अर्थात गुगल्या)॥

…ह्या होत… दैनिगुगुल्या

‘ग’जराचे घड्या’ळ’

तर ते राष्ट्रवादाचे गजराचं घड्याळ परवा आम्ही थोडे दुरुस्तही केले. म्हणतात ना देर-ए-दुरुस्त तसे।

त्याचे डोक्यावर ठेऊन दिलेले मोकळे पाय अगदी टाटा-नॅनो इ-स्टाईलमध्ये केमिकल वापरून पायाच्या जागी चिकटवून टाकले… नंतर त्यात भारितकुपिका (बॅटरी सेल) स्थानापन्न केली तर असे लक्षात आले की त्याचे हात मोकळे असून त्या हातांवर यंत्रणेचे फारसे नियंत्रण राहिले नाही… म्हणजे सेकंदकाटा प्रामाणिकपणे काम करतो आहे पण मीनीटकाटा आणि तासकाटा ऐकतच नाहीत घड्याळाचे….

म्हणून ते उघडून सर्व यंत्रणा साफ केली मग असे लक्षात आले की ते घड्याळ अद्भूतरित्या कधिकधी नीट वेळ दाखवते तर कधि ते मागे पडते. एकूण काय आम्ही ते एवढ्यात फेकून न देता त्याचा सेकंदकाटा व्यवस्थित चालू आहे एवढ्यावरच समाधानी आहोत…

त्याची मूळ कथा अशी की आमच्याच (ए)कनिष्ठ बंधूनी आम्हांस ते घड्याळ काही वर्षापूर्वी भेट दिले. बिलो पॉव्हर्टी लाईन (बीपीएल्) मोबाईल असे त्यावर छापलेले आहे… कित्ती विरोधाभास आहे ना…? तर ते आम्ही जेव्हा फेकायला निघालो तेव्हा वाटेत एक मित्र भेटला तो म्हणाला अरे ह्याच्या बाजूचे लाकूड (हार्ड टीकवुड) छान आहे तेव्हा त्यातली मूव्हमेंट खराब झाली असेल तर ती रु. ४५/- मध्ये बदलून मिळते… तर तसे करू. म्हटले आम्हांस काय फरक पडत नाही…. म्हणून ते घड्याळ घरी परतले… म्हणजे त्यावरील अक्षरांमुळे।

आता कायद्याच्या भाषेतला दैनिकसवाल

हे जर राष्ट्रवादी असतील तर ह्या मुकद्दम्यातले प्रतिवादी कोण? म्हणजे (स्थानिक इंग्रजाळलेल्यांनी) जयकर नियमाद्वारे ग्रेस मार्क देऊन पास केलेला पक्ष! आमच्या मते ते सर्वार्थाने नापास झालेलेच तरीही परकियांनी पुढे ढकललेले एक प्यादेच.