Archive for » 2005 «

डायरीतून…२

नकारात एक तेज आणि सामर्थ्य आहे,आव्हान आहे.समोरच्या माणसाने तुम्हाला होकार दिला म्हणजे सगळे आव्हानच संपते.तुमचे चुकले असेल तरी तुम्ही बरोबर आहात ,असा अहंकार समोरच्या होकाराच्या हुंकाराने तुम्हाला मिळतो.पण प्रत्येक नकार तुम्हाला तरल ठेवतो म्हणूनच तारतो.तुमचा मुद्दा नाकारणारा तुम्हाला विचार करायला लावतो.त्या विचारतून खंबीर आणि तर्कशुद्धपणाने तुमचा स्वत:वरचा विश्वास दृढ होतो.किंवा ज्या प्रमाणात तुमची चूक आहे,त्या प्रमाणात तुम्हाला स्वत:ला सुधारण्याची संधी मिळते.

डायरीतून…१

निसर्गाने आपल्यापुढे अनेक गणितं मांडली आहेत, त्याचं प्रत्येक गणित बेरीज करून सुटतच असं नाही,काही ठिकाणी वजाबाकी किंवा भागाकार सुध्दा करावा लागतो.

वामन परत न आला – जयंत नारळीकर

शनिवारी तसा गारठा बराच होता, कुणी येणारे जाणारे नव्हतेच. आणखी ‘बोर’ होऊन झोप लागण्यापूर्वी मरगळ घालवायचा शेवटचा उपाय म्हणून, खूप दिवस वाचायची राहून गेलेली जयंत नारळीकरांची ‘वामन परत न आला’ हि विज्ञान कादंबरी वाचून काढली.
‘वामन परत न आला..’ ही विज्ञान कादंबरी भविष्यातील अतिप्रगत संगणक यंत्रणा व त्यावर विकसित यंत्रमानव यांच्याभोवती आहे.यंत्रमानवात भाव-भावनांचे विकसन, फॉन नॉयमन प्रमेयांवर आधारीत त्यांच्यात आणलेली पुन:निर्मीतीक्षमता, माणसांची अति-यंत्र-अधीनता व त्यामुळे मानवजातीच्या अस्तित्वालाच असलेला धोका या मुद्यांना धरून असलेले कादंबरीचे कथानक मला तरी मनाला निश्चीत भावले, atleast शनिवारची सकाळपासूनची मरगळ तर नक्कीच गेली.
एक विशेष बाब इथे सांगावी वाटते ती म्हणजे या पुस्तकाची प्रथमावृत्ती आली ती १९८६ मधे..सुमारे २० वर्षांपूर्वी.त्यावेळी संगणकाचा वापर वैज्ञानिक प्रयोगशाळांपुरताच मर्यादित होता, याची जाणीव कादंबरी वाचताना प्रकर्षाने होते.संगणक व यंत्रमानव याविषयी एका वैज्ञानिकाकडून आलेली हि ‘फिक्शन’ २० वर्षांनंतर बग’शी मारामारी करणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रामर्सनी एक गंमत म्हणून वाचायला काहीच हरकत नाही.

Many Lives, Many Masters

Many Lives, Many Masters
Last week I finished with the book Many Lives, Many Masters.It is an interesting, well-written and thought-provoking exploration of the influence of past-life therapy on present behavior. You cannot put it down without feeling empathetic with Dr. Weiss’s conclusions.

Category: Other  2 Comments

संत कबीर

	लेके तनके नापको, घुमे बस्ती गांव ।
	हर चादर के घेर से, बाहर निकले पाॅंव ॥
			- संत कबीर
Category: Other  2 Comments