Archive for » 2009 «

सदा उत्तमाचा…

गांधींनी मृत्यूपूर्वी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की जर अंत्यसमयी त्यांच्या मुखातून नाम आले तरच ते महात्मा असतील.

सावरकरांकडून मिळाला “धन्योहम्”

आता “हे राम” आणि “धन्योहम्” ह्या दोन्ही गर्जना जर कसपट्टीवर लावल्या तर उत्तर स्पष्ट होते.

दासबोधातील अनेक समासामधून रामदासांनी स्पष्ट केले आहे की सदुगुरुला कधीही आपल्या अस्तित्वाविषयी शंका नसते.

संशयात्मा विनश्यति असे संस्कृत वचनही आहे.

स्वतःच्या प्रत्येक कृतीबाबत सद्गुरु नेहमी आश्वस्त असतो.

आता हे त्रुटीपूर्ण असल्याचे जर कुणी निदर्शनास आणून दिले तर मी रामदासांचा दासबोध पुन्हा वाचन करेन :-) कारण “प्रयत्नेवाळूचेकणरगडितातेलहीगळे“.

हे तुलनात्मक विश्लेषण आपण अशासाठी करतोय की….

क्रमशः

कथा पंचमी

श्रीराम विद्यालयातून चौथी उत्तीर्ण होऊन पाचव्या यत्तेसाठी मी नव्या शाळेत पोहोचलो आणि आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेतील आंग्लभाषाध्यायनाला सुरुवात झाली. काय मजा थोड्याच दिवसात आमच्या इंग्रजीच्या शिक्षिका की ज्या आमच्या वर्गताई (वर्गशिक्षिका) सुद्धा होत्या त्यांनी मला अचानक एक दिवस वर्गप्रमुख (म्हणजेच क्लास मॉनिटर) नेमले.

त्याच दिवशी त्यानंतर थोड्याच वेळात एका तासाचे शिक्षक न आल्याने सर्व मुलांनी गोंधळ सुरु केला. मी साधारण गोंधळ कुणामुळे होतोय हे पाहून त्याला व इतरांना शांत बसायचे विनंती केली ती कोणीही न मानल्याने मी त्यातल्या सर्वात दंगेखोर कक्षाबंधुला कानाखाली वाजवली. त्यानंतर सर्व मुले शांत बसली… आणि थोड्या वेळाने आमच्या वर्गशिक्षिकाही परत आल्यावर त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन मला पदमुक्त केले….

असे होते माझे औंट घटकेचे वर्गप्रमुखपद आणि हा झाला इंग्रजी शिकायला सुरुवात झालेल्या कक्षेतला १ ला व सर्वसाधारण मराठी माध्यमाच्या ५ वीतला पहिला अध्याय… :-)

चंद्रबिंदु

चंद्रबिंदु

एको

गेल्या काही महिन्यात पाहिलेल्या अनेक होर्डिंग्जपैकी मला सर्वाधिक आवडलेला फलक संदेश बाळा तुझ्यामुळे मी आई जाहले. तो वाचल्यानंतर बराच विचारही आपोआप घडला आणि आज तोच इथे पुन्हा दृश्यमान होतोय. आम्हांला तरी हे फारच गहन वाक्य वाटले.. एवढे गहन की असे काही मी गेल्या कित्येक वर्षात वाचलेच नव्हते…

मौक्ष-मुक्ती ही तुझीच रूपे…

स्वातंत्र्य चळवळीचा व्यवस्थित आढावा घेतला असता असे लक्षात येते कि स्वातंत्र्यचळवळीचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्याच्या सर्व दिवसाच्या सेनानींनी एक एक सामाजिक चूक दुरुस्त करित अशी वेळ आणली की परमेश्वरालाही हा प्रश्न पडला असावा. तो कोणता? हे जाणून घेणे हीच खरी स्वतःच्या स्वातंत्र्याची चाचणी परिक्षा ठरते…

आता ह्यात किती जण उत्तीर्ण होतात आणि किती अनुत्तीर्ण हा विषय नसून तुमचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रवास किती झालाय एवढेच जाणता येऊ शकते (हे ही लेखकाचे वैयक्तिक मतच आहे)

ह्या सर्वांची यथार्थ नोंद सावरकरांनी लिहीलेल्या समग्र वाङ्मयात आढळून येते… आता झाली वैयक्तिक आणि ऐतिहासिक नोंद ही की ज्या एका विशिष्ठ वेळी मी नाशिकला फिरकलो तेव्हा मला भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने हे पुस्तक मिळाले की जे तेथील पुस्तक प्रदर्शनातील विक्रेत्याने आवर्जून वाचनासाठी दिले…

वेद हे देखिल सृष्टीतील परमेश्वराने प्रवासातील मार्गदर्शनार्थ ठेवलेल्या पाऊलखुणाच असे आमचे मत एकही वेद न वाचता केवळ स्वानुभूतीवरून आहे.

असे कितीही असले तरीही शेवटी क्रीयेविण वाचाळता व्यर्थच… कारण उत्तरादाखल तारीख १४ वा १५ ऑगस्टच आली. जी धर्म राजाच्या नरो वा कुंजरो वा सम ठरते… म्हणून भारतीय वानर सेनाच सर्व राम (नाव) कामी उपयुक्त. हे (अधम रक्त रंजिते) येरागबाळ्याचे कामच (उदरभरण) नोहे (जाणिजे यज्ञकर्म).

प्रस्तुत लिखाण हा त्या आम कार्यसमृद्धीतला खारीचा वाटाच…

What is your name? ह्या सरळ वाटणाऱ्या कूट प्रश्नाचे उत्तर नेम सहाय्यकाच्या प्रत्येक कवितेनंतर एक एक तवा फोडता फोडता अखेर घोरीचाच वेध घेऊन शिन्धु संस्कृतीचे एक पायंडारूपी उदात्त उदाहरण दाखिले आहे.

आता प्रश्न उरतो की आपण आपले डोळे कोणी फोडेपर्यंत वाट बघायची काय? आणि खरं तर हा वैयक्तिक प्रश्नच आहे त्यामुळे कोणाच्या प्रेशर कुकरची शिट्टी कधी वाजते व कोण किती शिट्ट्या होईपर्यंत आपला भात शिजायची वाट पाहू शकतो हाही वैयक्तिक क्षमतेचाच लेखाजोखा ठरतो.

आता जर Direct Action ची घोषणा जीन्नाह कडून घडली म्हणजे त्यांची शिट्टी अगोदर वाजली म्हणावे तरी त्याचा अर्थ त्यांची डाळ नक्की शिजली असा ही होत नाही.

आता पाकिस्तान आणि चीनकडून भारताबाबत सिमोल्लंघन घडले म्हणावे तर हा हिंदु संस्कृतीचाच विजय ठरेल आणि त्यांनी हल्ला केला म्हटले तर त्यांना स्वमर्यादापालन करता आल्या नाहीत म्हणजे पर्यायाने ते हतबल झाले असा होतो.

अतः

मौनं सर्वार्थ साधनं

इति कीलकम्

असाही (पेन-टॅक्स नव्हे) योग

आजच्या अनेक गोष्टी इतक्या योगायोगाने चालू आहेत (बहुदा अदृश्यमानदगुरुकृपायोगच असावा) तर म्हटले दुसरे काही नाही तर हाही योगिकस्नॅपपोस्ट करावा…

योगायोग

आता ह्यात काय वैशिष्ठ्यपूर्ण आहे ते ज्याचे त्याने पहावे आणि ओळखावे…