१९९९ साली जेव्हा मी एका छोट्याश्या अमेरिका प्रवासानंतर परतलो तेव्हाची गोष्टआहे ही.
गेलो होतो ते काम काही होणार नाही हे अगोदरच ठाऊक होते (अगदी धोंडोपंतांना किंवा तितक्याच समर्थ ज्योतिषांना न विचारताही) तसेच घडले… पण एक महागडा अनुभव पदरी पाडला जेणेकरून आसपासच्या बोलणाऱ्यांचा तोंडाला कुलूप घालण्यास समर्थ ठरलो… तो विषय ह्या पोस्टचा नव्हे. ह्यात धोंडोपंतांना एकदाही न भेटलेला किंवा त्यांच्याशी न संवाद साधलेला (विसंवादी) मी नेहमी त्यांचा उल्लेख का करतो हा प्रश्न तूर्तास्त वाजूला ठेऊया.
तर विमान जसजसे मुंबईच्या जवळ येऊ लागले तसा इंमिग्रेशन एक संपूर्ण इंग्रजी फॉर्म मिळाला त्यावर मी सर्व उत्तरे मराठी( होय तीच ती अमृताते पैजा जिंकेवाली )त लिहीता जाहलो. त्यातील तुम्ही काय करता किंवा कमावता असा काहिसा एक प्रश्न होता त्याचे उत्तर काही नाही असे लिहीले. हेच ते खरे उत्तर विमानतळावरील तपासनिसाला (ह्या एक महिला होत्या) खटकले आणि त्यांनी मला तेथील पोलिसाच्या (खाकीवर्दीतला साधाच मराठी तरीही दर्दी मनुष्य) हवाली केले (प्रश्नोत्तरासाठी पाठवले).
तो हवालदार खरंच थोर होता आहे कारण त्याने फक्त एकच प्रश्न विचारून,
प्रश्न त्याचा - मराठी समजतं का?
उत्तर माझे – समजतं थोडं फार
मला सोडले…
शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले असेच आहे सर्व मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी हा लेख… कारण तेव्हां मी काहीच कमावतही नव्हतो… आणि कमावलेले सर्व गमावूनही स्वस्थचित्त होतो… म्हणजेच पारमार्थिकरित्या श्रीमंती( पुढे काय? )ची वाट धुंडाळत होतो.
परंतु शेवटी समर्थ वाक्याचं प्रमाण…

Lak-lak-lakaa dhoommm !