जर जर्मनी बेकरीतला स्फोट रिमोट कंट्रोलने झाल्याचे सिद्ध झाले तर काय बाळासाहेब आपले घोषवाक्य बदलणार काय? ते वाक्य महाराष्ट्रातील सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याच हातात आहे… आणि भारत सरकार नेहमीचे धोपटवाक्य बदलणार काय? ते वाक्य इसमें आय एस आय का हात है. कारण तो हात हे तर कॉंग्रेसचे चुना-व-चिन्हच आहे…
एक प्रश्न: पूर्वीच्या ISI चे काही वर्षांपूर्वी BIS झाले तरीही भारत सरकारने ISI ह्या ट्रेडमार्क का जपलाय?
असा काही रिमोट कंट्रोल असता तर तो घेऊन सतत बोंबाबोंब केली असती का?
म्हणतात ना उथळ पाण्याला खळखळाट फार (हे मात्र मी स्वतःबद्दला बोलतोय बरंका!)
तेव्हा दादा कोडकेंच्या नावावर खपवल्या जाणाऱ्या तो हात चोळीत गेला च्या धर्तीवर आम्ही तो हात MoDeeत गेला असेच म्हणणार… आता हे मोदी की मोडी हे मात्र ज्याचे त्याने ओळखायचे.
तसे बऱ्याच माहितीतल्या लोकांचे हात गेल्या ५-७ वर्षात मोडलेले बघितले आहे आम्ही आणि त्याची सुरुवात बहुदा आमचाच खांदा मोडण्यापासून झाली…. अशा बाबीत माझेच लाडके गाणे एक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा…
त्यामुळेच की काय आम्ही आजकाल कोणालाही अभंगीत खांदा देऊ शकत नाही. तेव्हा मैत्रांनो मरायचेच असेल तर राम राम म्हणा पण आमचा खांदा तेवढामागूनका.
