बाप – १ कविता

१ जाने. २०१० ह्या दिवशी एका अविचलचित्त आणि सुस्वभावी मित्राकडून आलेली तरीही त्याला ती समीर देव नामक दुसऱ्या कोणीकडून आलेला काव्य

तो एक बाप असतो…
शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहात असतो,
कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो…


मूळ कविता पूर्ण स्वरूपात येथे वाचायला मिळेल
…..

बाप नावाच्या पारिजातकाचं, असंच काहीसं जिणं असतं,
…….
कविता पूर्ण स्वरूपात उपरिनिर्दिष्टित स्थानी जावूनच अवश्य वाचावी ही आग्रहाची विनंती…!
त्याचा दुसराच कोणीतरी कवि असेल तरीही त्यांनी तिकडेच केस दाखल करावी ही कळकळीची विनंती…

आमची टिप्पणी: प्राजक्तांच फूल हे आमच्या ज्ञानानुसार असे असते की त्याचा पसारा शुभ्र आणि फुलाचा खुंट भगवा (अर्थात केसरिया) असतो… पिकल्या फुलाचा देठ जय हो भगवा! उर्वरित माहिती भारतीय संस्कृती कोषात… शोधा म्हणजे सापडेल!

आई म्हणोनि कोणी आईस हाक…

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
2 Responses
  1. प्रिय शिरीष.

    आपला ब्लॉग वाचला. खरंतर बाप या कवितेमुळे वाचला. कविता कशी आहे माहीत नाही, पण ती माझी आहे एवढं निश्चित. ती मी माझ्या वडिलांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमात, २० डिसेंबर रोजी सादर केली होती. त्यानंतर २१ डिसेंबरला एफफाईव्ह नावाच्या साईटवर माझ्या नावानं प्रसिद्ध झाली. त्याच दिवशी दुपारपासून ते आजतागायत मला हीच कविता अनेकांनी स्वतःच्या नावाने पाठवली आहे.
    आपल्याला आवडली, म्हणून आपण ती प्रसिद्ध केलीत, याबद्दल आभारी आहे. कारण हीच कविता आपल्या ब्लॉगवर स्वतःच्या नावाने प्रसिद्ध करणारेही मला भेटले… त्यामुळे आपण खूप वेगळे ठरलात.
    कृपया या कवितेखाली माझं नाव दिलंत, तर आनंद होईल.

    धन्यवाद
    अभिजित थिटे
    abhijitthite@gmail.com

    मूळ कवितेची लिंक
    http://ffive.in/a-poem-on-father/1232

  2. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आवश्यक वाटल्या तितक्या दुरुस्त्या केल्या आहेत… :-)

    म.रा.प.म. (एस्. टी.) चे ब्रीदवाक्य: आपली तक्रार तक्रारबुकात लिहा!

    आपल्या वडिलांचे नांव न कळविल्याबद्दल मनःपूर्वक आभार!

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>