आज काही कारणाने स्वान लेक ह्या चायकौव्स्कीच्या कॉंपोझिशन कधितरी ऐकल्याची आठवण झाली आणि त्यावर संशोधन करता समोर पॅथेटिक शब्द आला. आणि एरवी स्वैर भ्रमंती करणारे आमचे मन काही काळ विचारात गुंफले… तो शब्द तेथे मृत्यूशी निगडीत दर्शविल्याने आम्ही आत्ताच तयावर पुढे प्रवास करू इच्छित नाही…
खरे तर सध्याच्या भारतीय राजकारणाची अवस्था हा शब्द चांगली दर्शवितो ह्या वाक्याचे पुन्हा २ – ३ अर्थ निघतात पहा वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारून!
तरीही ह्या शब्दावरून आम्हांला शब्द सुचतो तो म्हणजे पांथेय
ह्या पाथेय ह्याचे दोन अर्थ सापडतात…
१. प्रवाससामग्री, शिदोरी
२. और्ध्वदेहिक कर्मात करावयाचे एक विशिष्ट श्राद्ध
॥शुभास्ते पंथानः सन्तु॥
