नेत्रदीपक नेमिकरण (अर्थात नेने) स्पर्धा…

आम्ही आमचा पुढचा प्रकल्प हाती घेणार तेव्हा प्रथम पूर्वीच (मागल्या वर्षी पुढील बाजूस) बांधलेल्या सुलभ शौचा(लया)ला कोणत्या राजकीय नेत्याचे नांव द्यायचे ह्याची स्पर्धा घेणार… अर्थात निकाःल आधिच जाहीर आहे की ते नांव कोणत्या तरी एका इंडियन विगत कॉंग्रेजी नेत्याचे असणार… कारण अहो स्पष्ट आहे… त्यांच्या नामाशिवाय हे नामकरण होऊच शकत नाही असा सामान्य जनतेने खापर (कौल) दिलासा… तेव्हा आपल्या आवडत्या आणि नावडत्या राजकीय काळ्या-घोड्यांची नांवे तयार आसू द्या बर कां मंडळी.

तसे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राण आणि सर्वस्व गमावलेल्यांची नामावळी खूप मोठी आहे पण तिकडे बघतो कोण…? तेवढी माहिती नीट संकलित केली तरी त्याचे पुण्य ताज्या जनगणनेपेक्षा मोठे हे कोणास नसे ठाऊके…!

ता.क.: मागल्याच वर्षीचा इन ग्रेटफुल डेड हा सालाबादी लेख यंदाही नळाला कमी प्रेशरने पाणी आल्याने पुढील वर्षी प्रसिद्ध होईल ही काळजी कृपया वहावी म्हणून दिल्ली जाहीर नोटीस…!

फु.नो.: पूर्वी ह्या देशा(साठी)त मरण आले की सौभाग्य समजायचे… आजकाल मेलेल्यांना मरूच द्यायचे नाही ह्यासाठी झपाट्याने त्यांची नांवे सर्व ठिकाणी पटापट लावणे राजकीय स्पर्धा असते…! अर्थात ह्याचे सर्व श्रेय ह्या देशावर जास्तीत जास्त काळ राजकीय सत्ता वाजवणाऱ्या भारतीय जनता ह्या राष्ट्रीय पक्षालाच (मोरालाच) मिळणार हे नक्की…! तिकडे लगेच कोणी लगेच गडावर (शेवगांवला) मोर मेंथॉल नावाची परकीय (विस्वदेशी) सिग्रेट ओढू पाहिल म्हणून दिली पूर्वसूचना…

एक अपूर्वप्रश्न: तिकडे गजानन महाराजांच्या शेगांवात स्वहस्ते वळलेल्या चिलमीव्यतिरिक्त कोणकोणत्या ब्रास ब्रॅंडच्या शिग्रेटी मिळतात तेवढे उत्तर कृपया जमल्यास कुणा पोश्ट्या जोश्यामार्फत कळविणे… ही सप्रेम विनंती.
औदाच्या किंवा म्होरच्या वर्साला आमी थंय वसू पोळोयतले (म्हणजे पळू वसोयतले!) कारण आमी दोनीबी ओडत न्हाई… :-)

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>