चक्षुतपासणी… (चक्षुचाचणी :-)

किती जणांना माहित आहे की आपण जेव्हा नेत्रवैद्यकाकडे जातो तेथे मराठी (माफ करा मला देवनागरी म्हणायचेय) अक्षरे असलेला सरकता फलक तपासणी करता ऊपलब्ध असतो. बहुदा कोणताही चक्षुवैद्य तो लगेच दाखविणार नाही पण तुमचे खरे प्रेम मराठीवर असेल तर माझ्यामते अवश्य मराठीतूनच वाचन करायचा आग्रह धरा आणि बघू काय नंबर निघतो ते…

मी अलिकडेच हा प्रयाग केला आणिक गूढ अनुभव आला… म्हणजे दोन वेगवेगळ्या नंबरांनी मला सारखेच दिसत होते… :-) म्हणून आमच्या (खरोखरीच) दयाळू वैद्यकांनी शब्द दिला की तुमचे नेत्र आपोआप जुळवून घेतायत तेव्हा नंबर कमीचाच ठेवा…

तर मंडळी ते ऑटोमॅजिक यंत्र अवश्य टाळा! शेवटी आपला माणूस त्या यंत्रापेक्षा चांगली तपासणी करतो हेच खरे बरं का! त्या यंत्राने फुकट तपासणी तर नक्कीच टाळा कारण बरेच चष्मेवाले ते यंत्र घेऊन शॉर्टकट मारते झालेत… हे मंजे अगदी मेडिकल शॉप मधून तिथल्याच माणसाच्या सल्ल्याने औषध घेण्याइतकेच किफायतशीर असते… शेवटी काय आपलेच नेत्र आणि आपणच शोधणार त्यातील दोष…

विवेकानंदांच्याच भाषेत सांगायचे झाले तर बलाची (म्हणजेच तेजाची) उपासना करा… कारण नेत्र हे तेजाचे स्थान आहे…

आता आम्ही उपनेत्र का वापरतो हा मात्र एका वेगळ्याच लेखाचा विषय आहे… ते परत कधितरी निवांतपणे… कदाचित आम्हीच ते आंधळे असू ही शक्यता आम्ही कधीच नाकारत नाही… :-)

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>