मे आय गो (MIG) हे तर खरे विमानाचे नांव परंतु आपल्याच (हो आपल्याच) भैरावत साहेबानी (15 मे, आय गो! ने) ते सिद्धच करून दाखविले की हो… आता हुंडै i-10 आणि i-20 च्या मध्ये भैरोसिंगजींची i-15 (म्हणजे १५ क्रमांकाचे महत्व पुन्हा इस्पष्ट केलेच) च शोभून दिसते असे आमचे स्पष्ट मत.
हेच शेखावत साहेब आपले भाषण करायला ऊभे ठाकल्यावर योगकंपित झाले होते… तेच आज १५ तारखेच्या योगावर गेले…
गुरुवारी दवाखान्यात दाखल आणि शनिवारी प्रयाण इतके स्वच्छ गमन… हा हृदयक्रिया बंद पडणे जरा वाईटच योगामध्ये … पण नाहितरी काही लोक मरणासाठी जगत असतात, तर काही जगण्यासाठी रोज मरत असतात…
बघु १५ अगस्तपर्यंत आजून काय काय घडते ते!
