हे द्वंद्व आमच्या मनात बरेच दिवस चालू होते… शेवटी निकाल स्थानाच्या बाजूने लागला त्याची ही छोटीशी कारणमिमांसा…
आता स्थान ह्याच्या अगोदर कोणता शब्द जोडायचा हे गौण असल्याने तात्पुरते आपण त्याला गौणस्थान असेही म्हणू शकतो….
तर स्थान हा शब्द दूरान्वयाने की होईना पण स्थाणू म्हणजे स्थीर किंवा स्थैर्य ह्याशी संबंधी (समधी) वाटतो तसे काही स्तानाचे होत असलेले आम्हांस तरी जाणवले नाही म्हणून म्हटले की हे (शिव)धनुष्य तरी किती काळ ताणून धरायचे म्हणून आम्ही आजचा लहरी गुरुसृष्टी वरील आमचाच मागील लेख वाचला आणि स्पष्ट कौल स्थानाच्या बाजून वाटून आमची लेखणी सरसावली… कारण आम्हीच लिहून ठेवलेले काय होते हे सुद्धा विचार करण्याइतकी सुद्धा स्मृतीपटले आम्ही वाया घालवत नाही. जे काय घडले तेच सत्य बाकी सर्व त्याचीच मिमांसा असा सुविचार…
आता ह्या विषयावर कोणाला ताथैया ताथैया ओ… हा जस्टीस चौधरी (की कुठल्यातरी) सिनेमातले श्री देवी चा नाच करायचा असला तरी अवश्य करावा हीच सप्रेम विनंती
