जंगलातली भाषा, राहणी, विचारसरणी फारच वेगळी असते… आता हे विचार सिंहासनावर बसून स्वथःला वाघ म्हणवत कोल्हेकुई करणाऱ्यांना कधी आणि कसे कळणार…?
आथा अगधी अलिकडीलच सोदाहरण बगा… सिंहसनावरून वाघाचे राज्य जालू होते… तेव्हा एक बछडा वेगळा पडला. त्यातच काही वाघाचे कातडे पाघरलेले लांगडेही असावेत असे आता वाटते…
कारण… कारण…
जेव्हा बोटबुडी होणार असे भाकित झाले तवा परथम उंदीर बोंबलत भायेर पळतात तसेच झाले… तर…. बोंबलत भायेर पडलेल्या उंदरांनी की जे वाघाचे कातडे पांघरलेले लांडगेच लगेच दुसऱ्या मेढपाळांच्या हाताखाली मेंढरात सामील झाले आणिक स्वाभिमान नावाचे एक नवीन मोट बांधायचा यत्न सुरु केला….
पण तरीही आम्ही निरपेक्ष भावनेने ही सर्कस बघणे सुरुच ठेवले. कारण अजुन विधुशक (हो काही लोक शिवशकही म्हणतात त्याला) महाराज अजून रिंगणात उतरले नवते…
आणि बघता बघत विदुषकाने आपले बस्तान बसवून स्वतंत्र व्यवहाराने आपणच वाघ हे सिद्ध व्हा(तिच्या)यला सुरुवात झाली… पण वात आहेच म्हटंल्यावर (मै) समय (हूँ) महाराजही काही स्वस्थ बसणारे नव्हते…. म्हणून चक्क्रीवादळाचे तडाखे देत त्यांनीही त्या कूटात अजून आपले मेतकूट घातले….
तिकडे इंद्रायणी आरशात स्वतःला पाहून आरशा आरशा खरं खरं सांग म्हणत असतानाच इकडे पालीकेच्या डंपरनाथांनी तिची बंधीगळ उपसायला सुरुवात केली…
अजून पुण्यात एम् जी एम् (Metro Goldwin Meyers) चा परिणामकारी स्ट्रेप्सिल्स खाणार सिंह उगवलाही नाही तोवर अलिकडेच रादीव गांडी उद्यानातल्या आमच्या शफरीत आम्हांस सर्व प्राणीमात्रांनी खडी ताजीम दिल्याने निर्धास्तावलेले आम्ही गळणाऱ्या छपराच्या दुकानातून पावसाच्या पाण्याने तुबलेल्या रस्त्यातून वाट काढत स्वगृही परतलो तर बायकोचा आला फोन…
काय म्हणे तर… “रांगोळी संपलीये…”
ती(र्थरूप)च्यायला “रांग” आणि “ओळ” हे दोन समानार्थी शब्द एकत्र जोडून केलेला हा शब्द आज काय भविष्य दर्शवितो हे पाहू बाजारात गेलो तर सर्व धार्मिक सामानाची दुकाने बंद…
थोडक्यात काय गरज नसूनही “राज”स्थानी वाण्याच्या दुकानात रांगोळीची भीक मागून त्याच्याच कृपेने “मोहन प्यारा” नांवाची रांगोळी दहा रुपयांना विकत घेऊन ते फुटके पाकीट गळत असल्याने रस्त्यात रांगोळी घालत आम्ही घरी येताना वाटेतच त्याला “शीर्षासन घडवून“ उरलेली रांगोळी बायकोच्या हातात देऊन आमच्या कोनाड्यात पुनश्च स्थानापन्न… !

नमस्ते,
आपका बलोग पढकर अच्चा लगा । आपके चिट्ठों को इंडलि में शामिल करने से अन्य कयी चिट्ठाकारों के सम्पर्क में आने की सम्भावना ज़्यादा हैं । एक बार इंडलि देखने से आपको भी यकीन हो जायेगा ।
आपणही एक समीक्षक बनून आमचे महत्वाचे लेख तिकडे संक्षिप्त स्वरूपात टाकून इकडे वाचा असे लिहिले तरी हरकत नाय!
अभिप्रायाबद्दल आभार..
येथील लिखाण हे कोणत्याही धर्मप्रसारार्थ केलेले नसून अगोदरच स्वधर्माच्या दिखाऊ चिखलात फसलेल्या प्रामाणिक सज्जनांसाठी केले आहे…
आपणही…. मराठा तितुका मेळवावा। स्वधर्म वाढवावा॥ हीच सदिच्छा..