गोष्ट (God of Small Things) भोपाळची…

आपल्या सर्वांनाच भोपाळची दुर्घटना आवडली नाही… अहो आम्हांला आमच्याच वंशावळीची बाल्यावस्थेतील शी आणि शू सुद्धा घाण वाटते तेव्हा भोपाळची घाण कशी आवडेल… पण असे म्हणून कंठशोष कोकलणाऱ्या किती जणांनी स्वतःच्या आयुष्यातील मौलिक वेळ स्वस्वच्छतेला अर्पण केलाय…

मुबंईतल्या मिठीला आणि पुण्यातल्या इंद्रायणीत राडारोडा टाकणाऱ्यांना फाशी लटकवले जाणार म्हटल्यावर लगेच घाम फुटणारे नेटवर्क (राजकारणी) गुरु हे आपल्याच देशातील जुन्या घटनांवर काय म्हणतात हे नक्कीच वाचनीय आणि संस्मरणीय असेल…

म्हणून ह्या चिखलात परमेश्वरालाही जर आपल्या बालगोपाळां समवेत हजेरी लावायची इच्छा झाली तर त्याला साक्षात दैवयोग म्हणायचे की कर्मभोग…?

१२~१३ वर्षापूर्वी आमच्या मातोश्रींनी दिलेला, शिरीष तुझे पाय फारच काळे दिसतात ते स्वच्छ धुवत जा, हा सल्ला आमच्या गळी न उतरल्याने तेव्हा मस्तीत (मै फेके हुए पैसे नही उठाता – इस्टाईल) दिलेले उत्तर ..”आई, ज्यांना गरज आहे ते माझे पाय धुतील, तू काळजी करू नकोस” (मूळ वाक्य… “आई, हे पाय इतरांनी धुवायची आवश्यकता आहे…!”) असे वर्तन बदलून जेव्हा विनम्रता अंगी बाणली तेव्हाच आम्ही स्वपद स्वच्छतेला सुरवात केली… आणि आजकाल तेच काळे पाय पांढरे नव्हे तर गहूवर्ण झालेत याचा आवश्यक तितकाच अभिमान दररोज संध्याकाळी उगवतो… आणि विनम्र मी सकाळी तितक्याच नम्रतेने स्वच्छतेचे काम करतो..

ह्या स्व-परिक्षेवरून आणि स्व-इतिहासावरून आम्ही इतके नक्की सांगू शकतो… अगोदर सर्वजण स्वमन स्वच्छता घडवा म्हणजे आपल्या भविष्यातील अनेक भोपाळ दुर्घटना टळतील… बाकी लढाई खूपच सोपी आहे…

थोडक्यात काय प्रथम स्वतः (वैयक्तिक आणि सार्वजनिक) स्वच्छतेचे पाईक बना…

जय हिंद

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
2 Responses
  1. Indli says:

    नमस्ते,

    आपका बलोग पढकर अच्चा लगा । आपके चिट्ठों को इंडलि में शामिल करने से अन्य कयी चिट्ठाकारों के सम्पर्क में आने की सम्भावना ज़्यादा हैं । एक बार इंडलि देखने से आपको भी यकीन हो जायेगा ।

  2. सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा ।
    सदा रामनामें वदे नित्य वाचा ॥
    स्वधर्मेंचि चाले सदा उत्तमाचा ।
    जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४८॥

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>