हा अतिशय गहन आणि प्रत्येकाच्या तितक्याच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे… मानो – या – ना – मानो शौचास जावेसे वाटले आणि नाही जायला मिळाले की चेहऱ्यावरची कलाकुसर बघण्यासारखी होते हा अनुभव नेहमीच अविस्मरणीय असतो.
तर बालपण भारतात घालविल्यानंतर काही लोकांची परदेशात राहताना गाडी नेमकी कुठे कुठे अडते ह्याची सर्वात अत्युच्च पदवी म्हणजे आयटी (अर्थात इंडियन टॉयलेट) आमचीही गाडी कधिकाळी त्याच स्पीड-ब्रेकरला जाऊन थांबली होती…
तर बराच काळ ह्या विषयावर लिहायचे टाळले होते पण काय करणार जास्त कलाकुसर विशेषेकरून इतरांना जाणवण्यापूर्वी भारतीय संडास ह्या विषयावर लिहीलेले बरे म्हणून हीच घातली ऋजवात (हा शब्द हवेली वाले घराची कागदपत्रे करताना “रुजवात” असा का लिहीतात बरे…?)…
जमल्यास पुन्हा कधितरी ६ शब्द लिहीन म्हणतो आय.टी. वर… आजच फार प्रवास नको करायला ह्या विष – या – वर
मात्र आय.टी. ह्या विषयावर, आय.टी. ने तरूण पिढीची कशी वाट लावून टाकलीये हे लिहीण्याची विनंती देखिल आम्ही आजच स्विकारून एका वेगळ्याच विषयाला तोंड फोडतोय की काय कुणास ठाऊक…
