आमचे भावी नेते(एक रुपक-कथा):
आमच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर रा. स्व. संघाची एक शाखा भरते हरसुप्रभाते… तिथे पटांगणातच जवळच एक वृक्षही आहे… आता पावसाळा किंवा हेमंत (हिवाळा?) सुरु होईल असो पण त्या झाडाची खाली पडलेला पालापाचोळा साफ करताना अजून एकाही स्वयंसेवकाला गेल्या सहा महिन्यांत पाहिले नाहीये… मला वाटते ते हायकमांडच्या (आ)देशाची वाट पहात असतील हातात झाडू धरायला..
स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्यातलं कुसळ दिसतं ह्यातलाच प्रकार आहे हा…
ह्या शाखेपेक्षा आगरताळा मधिल विमानतळ रस्त्यावर काही वर्षांपूर्वी पाहिलेली पहाटे ५~५:३० ची शाखा आम्हांला मनापासून भावली… इथे या शाखेत सर्व पुणेरी ( का | मा )वळे सावकाश सुर्योदयानंतर मावळताना दिसतात… असेल हिम्मत तर करा तो संघाचा ध्वज उभा राष्ट्रध्वजाच्या कोड नुसार सुर्योदयापूर्वी अन्यथा विसरा की हे हिंदुराष्ट्रच आहे…
ताक: हा… बाकी ते सर्व सूर्यनमस्कार छान घालतात हो…

आम्ही दररोज आमचे संघस्थान साफ करतो झाडून ..प्रश्न हा नाही. पाचोळा झाडायचा की नाही हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे त्याचा उगाच हायकमांड वगैरेशी सबंध का जोडावा? तुम्ही झाडता का मैदान? आणि हिंमतीचा काय सबंध…नित्य शाखा लावायला आणि ती वर्षानुवर्षे चालू ठेवायला खरी हिम्मत लागते. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे काय पगारी नोकर सुद्धा सांभाळेल…पण आपल्याला काही मिळत नाही हे माहित असताना त्याच स्थानावर एका पिधीमागून दुसरी पिढी येऊन शाखा सुरु राहते याशिवाय अधिक हिंमतीचे ते काय!
थोडे कठोर बोललो असेन. राग नसावा.
—विक्रम.
मी नेहमी पहात असलेल्या स्थानी जेव्हा सुधारणा घडली तेव्हा जाऊन त्याचे शाब्दिक कौतुकही केले आणि माझा दृष्टीकोन सांगितला.
पण कसे काय कळाले बुवा त्यांना मी न सांगता हे मात्र अनुत्तरीतच राहिल…..
संबंध का जोडू नये हे सांगा ना? माझा प्रश्न बरोबरच आहे ह्याची मला खात्री आहे…
नाही मला हे पटत की दुसरी पिढी येऊन शाखा चालू राहते हे हिंमतीचे काम आहे…मीही कदाचित कधितरी शाखेत जाईन अभ्यास करायला खरे तर… पण माझे विचार हेच राहतील… चालेल का? त्यामुळे मी संघ कार्यकर्ता बनेन की नाही हे मात्र माहित नाही कारण मी दुरून जेवढे पाहिलय तेवढ्या वरून तिथे काय घडते ह्याचा अंदाज आहे…
तसे काही प्रयोग केलेत मीही. अगदी गोमय साबण आणून त्याने आंघोळ करून अनुभूती घेतलीये अगदी शाखेत न जाता सुद्धा… कारण आमच्या एका मित्राला मी सुनावला “नाही निर्मळ मन तेथे काय करील साबण” लगेच तो मला हट्टानं कारयालयात घेऊन गेला तिथला साबण दाखवायला वगैरे वगैरे… पण तरीही त्याला काही मी “अठ्ठ्याचे प्रयोग” वगैरे नांव देणार नाहीये…
“”नाही मला हे पटत की दुसरी पिढी येऊन शाखा चालू राहते हे हिंमतीचे काम आहे…मीही कदाचित कधितरी शाखेत जाईन अभ्यास करायला खरे तर… पण माझे विचार हेच राहतील… चालेल का? “”
हेहे. एकदम मान्य. पण अशी वैचारिक सहिष्णुता असावी लागते जी सर्वांमध्ये नसते, धन्यवाद. “नाही निर्मल मन…”हे अगदी बरोबर आहे. पण तो साबण मस्त असतो राव!
ती एक वडी पूर्ण संपवूनच मगच बोलतोय… तो साबण लावून नित्य ऑफिसात जाणे म्हणजे “आ बैल मुझे मारच” इतका पक्का वास असतो त्याचा… कारण सर्व इंग्रजी लोक पुरुषाला ही गायच म्हणतात…
आणि अमेरिकनांनी “काऊ” चा अदोगरच “कॅन ऑफ वर्म्स” करून ठेवलाय हेही अंतरी ठेवा
दोन पुणेरी विद्वानांची चर्चा. त्यात आम्ही काय बोलणार बापुडे.
अरे! मुख्य विषय काय? भरकटत गेला कुणीकडे. अर्थात विषय समजण्यात आमची बुद्धी कमी पडल असेल.
शिरीषसाो आपण सूर्योदयापूर्वी उठून भारतभूमातेला किमान वंदन करता का? असेल हिंमत तर खरे उत्तर द्या.
“नाही” असे उत्तर देतो पण ते तात्विक दृष्ट्या चुकीचे आहे… विषय गहन आहे… पण तरीही प्रयत्न करतो.. योगही असा आहे की हे उत्तर मी आज कोल्हापुरातूनच लिहीतोय…
मी कोणालाही वंदन करत नाही एका परमेश्वराशिवाय, की ज्याच्या जाणण्यात ह्या भारतभूचा सर्वात मोठी हिस्सा आहे कारण ज्ञात जगातील सर्वात पुरातन संस्कृतीचे स्थान म्हणून… कधिकधी मी स्वतःला सुद्धा नमस्कार करतो… जेव्हा मी माझ्या शरीरात सूक्ष्म अर्थाने नसतो तेव्हा. आता हे अवघड वाटेल म्हणून सांगितले की मी कोणालाही नमस्कार करीत नाही.. पण अनेकांपुढे नतमस्तक मात्र होतो… आदराने…
हा देह धारण करून आजवर मला येथे रहायला मिळाल्याबद्दल ते शरीर मला देणाऱ्या माझा आईवडिलांपुढे मी प्रथम नतमस्तक होतो मग इतरत्र…
अविनाश,
आपण संबोधलेल्या दोन पुणेरी विद्वानांपैकी कमितकमी एक कोल्हापूरच्या मातीतच लहानाचा मोठा झालाय आणि तो कोल्हापुरी रुसवे, फुगवे, लाड आणि शिव्या थोड्याफार प्रमाणात जाणतो… तरीही तो जाणकार नाही कारण त्याच्याकडे कोल्हापूरात मिरवली जाणारी लौकिक पावणारी कोणतीही कार (चारचाकी) नाही. तो ॐकार रूपी विहीरीत (पन्हाळ्याची अंधारबाव नव्हे) पुनःपुन्हा डुबकी मारून मोती (रत्ने, माणके) शोधत असतो ही झाली स्पष्टोक्ती.
अभिप्रायाबद्दल आभार…