माली: माती मिळाली

आज प्रातःकालीन फेरफटक्यात भाजी आणताना माती मिळाली… म्हणजे जी आम्ही पूर्वी कधिकाळी भुईमुगाच्या शेंगा साफ करून मिळविली होती तशी ह्यावेळी ती रताळ्याबरोबर आली…. ज्यांच्या कडून रताळे घेतले त्या मावशींना विचारले… माती एवढी स्वस्त कधिपासून झाली… तेव्हा त्यांना काहीच कळेना म्हणून सांगावे लागले की त्या मातीची किंमत रताळ्यापेक्षा आम्हांस जास्त आहे…

तद कारणेन रताळे घेणे झाले नाहीतर आम्ही कसले घेत होतो ते रताळे… तर ती रताळी साफ करून सर्व माती आमच्याकडील (यज्ञ)कुंडात घातल्याशिवाय आम्हांस कुठलं चैन पडणार… २-४ वेगवेगळी छान रोपे आली आहेत सध्या कुंडांत… आणि तुळशीसाठी ठेवलेल्या स्पेशल कुंडातही त्यांचे आगमन १५-२० दिवसांपूर्वीच आपोआप झाले आहे… बाकी सर्व रोपे मात्र आम्ही टाकलेल्या बियांचीच असावीत असा प्राथमिक अंदाज आहे. त्यांतील काही रोपांची लवकरच पाठवणीही होईल… योग्य ठिकाणी… कारण बहुदा ती वृक्ष प्रकारातील रोपटी आहेत…

आता हिन्दी जनतेला मिली ह्या शब्दाचा अर्थ मिळाले किंवा मिळाली एवढेच कळणार तो वापरला नाही… मिलीभगतगिरी (म्हणजे लोकांच्या डोक्यावर मिरगुंड वाटणे असे आम्हांस वाटे) करण्याऐवजी सरळ सुंदर रसाळ असे वर्णन करणे आम्ही पसंद करतो… :-)

बा मिळाला असे म्हणावे तर कुठल्यातरी भाषेत आईला बा म्हणतात… म्हणून संक्षेपाने माथा ताळ्यावर ठेऊन अधिकरसग्रहणहमनेटाळा! आता मन्ने ह्या तेलुगु शब्दाचा अर्थ आम्हांस माहिती नाही हे अगदी कबूल… पण मनिग वा तत्सम कानडी चा मात्र थोडाफार जाण तो।

अर्थात आमचे टंकन हे नेहमीच परमेश्वरासाठी विरोप असतो.. तरी आपणही असेच साधे सोप्पे वैचारिक जीवन जगता तर आमचा नमस्कार, अन्यथा राम राम अमुचा…

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>