मनोशृंखला…

सावरकरांनी पुण्यात केलेल्या विदेशी कपड्याच्या होळीचे स्मारक बांधणे चालू होते तेव्हाची गोष्ट…

आमची स्वारी काही कारणाने कर्वे रस्त्यावरील त्या स्थानी भरकटली… आणि तेथील दृष्य पाहून अत्यंत दुःखी झाली…

कारण तेथे मजूरकाम करणाऱ्या एका महिलेने किंवा बाबाने तेथे त्यांच्या लहान दीड-दोन वर्षांच्या मुलीचा पाय सुतळीने एका खांबाला बांधून ठेवला होता…

अत्यंत दुःखी अंतःकरणाने आम्ही परतलो… त्यानंतर परवा आमच्या अर्धांगीने आपल्याकडे बऱ्याच वेळा काम करणारी मंडळी त्यांच्या लहानग्यांचा एक पाय बांधून ठेवतात जवळपासच्या खांबाला वगैरे जेणेकरून त्या बारक्याच्या जीवीताला आई वडील काम करत असताना इकडे तिकडे वावरण्याने होणारा कोणताही धोका पोहोचत नाही… असे सांगेपर्यंत आम्ही ह्या विषयावर कधीही कोणाशीही वाच्यता केली नाही… आता ते दृष्य फक्त मलाच माहित होते… मग ते तिला कसे कळले…?

अशा रीतीने आमच्या मनो व्यथेचे निराकरण झाले ते साल म्हणजे २०१० अर्थात शके १९३२ आणिक शिवाजी शके…

हे दृष्य आम्ही कधि पाहिले असावे हे त्या स्मारकाचे बांधकाम करणाऱ्यांना ठाऊकच आहे…

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>