लिफ्ट आणि एस्केलेटर (अर्थात माडी आणि जिना सुद्धा)..

बालपण माँझे:

पूर्वी एक वाक्प्रचार होता… “शहाण्याने वकिलाच्या घराची पायरी चढू नये..” मला वाटते त्या कर्त्यांना (जीनाच म्हणायचे असेल पण पहाट काळी खूप केळी खाल्ल्यामुळे किंवा) अनेक मजली शिडीच्या पहिल्याच पायरी वरून डिझ्झीनेस वाटल्याने त्यांनी पायरी असा उल्लेख केला असावा… आता पायरी म्हटले की लगेच तोतापुरी आंबे ८वतात… हापूस नव्हे…

आमचे (म्हणजे आंब्याचे) मात्र अगदी साधेच गणित (म्हणजे जे सहज सुटत नाही ते) ताडाच्या झाडावरून काढलेल्या सुरेला ताडी म्हणतात, आणि माडावरून काढलेली ती माडी, ह्यात जिन्याचा काय संबंध?

तसा मूळ वाक्प्रचारही थोडा वेगळाच आहे… शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण हे कळण्याएवढे आम्ही शहाणे असतो तर ना?

आम्हांला कल के लिए एक गाणे आठवतेय… कौन आया मेरे मनके द्वारे, पायल की झनकार लिये… सिर्फ ये कल कौनसा इतना मत पूँछो. आता आम्ही भारतीय (महाराष्ट्रीय नव्हे) प्रेक्षक फक्त अधून मधून (मधून मधून नव्हे) टाळ्या वाजवणार इतकेच. प्रश्न आमचा नाही (खासचा आहे) हे नक्की!

आम्हांला अगदी अल्लारखाँसाहेबांची (माँसाहेबांची नव्हे) पं. झाकिर हुसेन बरोबरची पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरातली जुगलबंदी ८वतेय!

धा गि ना ति ना क धि न

आज सावरकर असते वदले… “तबलामाझी ही माता रे”

बाकी एक प्रश्न मात्र आम्हांला… स्वातन्त्र्यलढ्यातील किती लीडर गैरवकिली होते? म्हणजे केस नक्की कोणत्या कोर्टात होती हे समजायला हवे ना म्हणून पुसतो हे अश्रू नक्की कसले? आत्ता तर ही शेषन कोर्टातली दिसते अजून बक्कळ टायम जायचाय. महाराष्ट्र गुलाम नवताज कंदीबी… मून म्हंतो प्रश्न देशाचा हाये… तवा जरा धीरानं घ्या. आणि जरा आरशात बघा येकांदेयेळेस तुमच्या मागं काय काय दिसतंय ते मंजे कळंल सगळं…

तर मंडळी… येतो आमी आता…

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
2 Responses
  1. Mahendra says:

    खुपच छान झालंय पोस्ट. ’आम ’ नाही तर ’खास’ झालंय. पायरिवर बसुन लॅपटॉपवर वाचलं. :)

  2. तिरंदाज says:

    अधून मधून ऐसे प्रतिसाद लाभले की आमचा श्वास अजून कोणत्या विश्वासावर दौडतो हे आमचिया चित्ती विशेषेकरून जाणवते…

    समाधानपूर्वक आभार
    प्रतिसादामुखीं

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>