आँधी जयंती… संदेश!

गांधी जयंतीच्या निमित्ताने माझी फेवरिट टिमकी वाजवून घेतो… ती अशी…

जो पर्यंत गाधी जयंती आणि तत्सम नेत्यांच्या नावाने आपण सरकारी आणि गैर…. सुट्टी जाहीर करून त्यांच्या तत्वांना दररोजच्या जीवनांत सोयिस्कर तिलांजली देतो तोपर्यंत हा दिवस सर्वार्थाने आँधी जयंतीच वाटतो…

कोणीसे म्हटलेय… ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी… ह्याच धरित्रीवर गांधींच्या जीवनातही असे काहीतरी असेल की जे शोधून आपण अवश्य अनुभवण्यासारखे आहे…

आज मी महात्मा, स्वातंत्र्यवीर, किंवा सर्वबहादूर नेते असा भेदभांव न करता मनोमन चिंतन करतो की त्यांनी संकल्प केलेला बलशाली ग्रामीण संकल्पनेवरचा हिंदुस्थान प्रगतीपथावर राहो…

आणि सर्व नेतेमंडळी व त्यांचे चमचेवर्ग हे जेवणा (खादी) ऐवजी अल्पोपहारावर आनंद मानायला शिकोत. तरच कधितरी या देशात सरकारी कामे पैसै दिल्याबिगर (म्हणजे उपाशीपोटी किंवा उपवास करून) होतील.

गांव तिथे उकिरडा च्या धर्तीवर सर्वत्र त्यांचेच पुतळे उभारण्याऐवजी तेच पैशे कसे वापरले हे RTI (आरती) खाली कोणीही न विनंती करता जाहीर करा. होय असे पुतळे ज्यांना मार्गदर्शनासाठी उभारले जातात ते सर्वसाधारण रित्या त्याच्या बरेच पुढे अगोदरच पोहोचलेले असतात हे झाले वास्तव.

आपापल्या प्रदेशाला अनुसरून केशवेषभूषा करण्यात लाज वाटून घेऊ नका… अन्यथा एक दिवस आजकालच्या ट्रॅडिशनल डे सारखेच हिंदुस्थानी ट्रॅजिडी डे साजरा करायची वेळ आल्याशिवाय रहाणार नाही.

विकतचे कपडे घेऊन वापरण्याऐवजी शिंप्याकडून माप देऊन शिवलेलं, तयार चपलेऐवजी तुमच्याच उजव्या अथवा डाव्या पायाचे माप घेऊन चांभाराने तयार केलेले चप्पल वापरा. कोणाला अंगावरून माप घेण्या-देण्यात संकोच वाटत असेल तर एकतर शिंपी किंवा चांभार बदला वा जुना कपडा किंवा चप्पला देऊन ह्याच दंडाचे माप एक इंच फुगीर हवंय अशा रीतीने उपयुक्त सूचना द्यायला विसरू नका. कारण देश हा (बुजगावण्यामसान) लेकुरे उदंड जाहली ह्या तत्वावर सुरक्षित रहात नसून बुलंद विचार सरणीच्या (सरपणाच्या नव्हे) थोडक्याच नेत्यांच्या हुषारीवर अवलंबून असतो.. आपण त्यातलेच एक बनायचा अवश्य प्रयत्न करा वा करवावा… कारण आजकालचे पक्षीसुद्धा (मानवरूपधारी) बुजगावणे आणि खरे गोफणगुंडाधारी ह्यातील फरक लगेच ओळखतात.

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>