Download Modee Font [ Developed in July 2001 ]
आदल्या दिवशी रात्री हातातलं पुस्तकं वाचून झाल्यामुळे त्यादिवशी सकाळी सकाळीच ‘पुढे काय?‘ च्या शोधात काकांकडे गेलो, शरीरासाठी औषध व मनासाठी एखादे पुस्तक आणणे, हा उद्देश ! त्या ‘आजारी दिवसां’ मधे मला गरज होती ती त्यांच्यासारख्या निष्णात डॉक्टरांची, शरीरासाठी आणि त्याहून जास्त मनासाठी ! असलेली चांगली नोकरी स्वत:हून सोडली होती, खिशात कोणतीही पदवी नव्हती, संगणकाचा अभ्यास जरासा कुठे चालू केला होता,छोट्या-मोठ्या गोष्टींमधे अपयश हात धूऊन मागे लागलं होतं, अशा वेळी दोन्हीवर औषधोपचाराचं महत्त्वाचं काम काकाचं करायचे.
मी त्यांच्याकडे गेल्यावर त्या दिवशी बोलण्याचा विषय अर्थात ‘संगणक आणि भाषा’ या ठिकाणी येऊन थांबला.
“ज्याला कुणाला भाषा व ध्वनीसंदर्भात संशोधन करायचे असेल त्याने हे पुस्तक वाचायला हरकत नाही”, अशा आशयाचं विधान करत त्यानी माझ्या हातात एक पुस्तक् दिलं, ल.श्री.वाकणकर लिखीत ‘गणेशविद्या’ या पुस्तकाची मराठी आवृत्ती होती ती. घरी आल्या-आल्या पुस्तक चाळायला सुरुवात केली, वाकणकरांची प्रस्तावना वाचताना डोळ्यात भरली ती त्यांची प्रस्तावनेखालील मोडी स्वाक्षरी !
… आणि मला माझं काम मिळालं-मोडीला संगणकावर आणायचं,मोडी फॉन्ट बनवायचा !
गणेशविद्याचं पुढिल वाचन व अभ्यास बाजूलाच राहिला, मोडी लिपीवरची काही पुस्तकं मिळवली ती वाचून काढली,पुणे विद्यापीठातील इतिहासाचे डॉ. मधुकर कुलकर्णी यांना एकदा भेटलो. संगणकावर मोडीसाठी काहीही उपलब्ध नाही यास त्यांनी दुजोरा दिला, यानंतर पुढील महिनाभर मी जे काम केले ती एक आनंदयात्राच होती. मी ‘सॅलरीड् एम्प्लॉयी’ नव्हतो त्यामुळे क्लायन्टचा तगादा मागे नव्हता,मी इंजिनिअरींग स्टुडंट नव्हतो त्यामुळे माझ्यासाठी सबमिशन ड्यू डेट नव्हती, मी फक्त माझ्यासाठीच काम करत होतो.अखेरीस हवी तशी अक्षरे देणारा मोडी फॉन्ट तयार झाला.या लिपीचे जनक-प्रसारक हेमाडपंतांच्या सन्मानार्थ या फॉन्टला ‘हेमाद्री’ हे नाव द्यायचे निश्चीत केलं.
मोडी लिपी संगणकावर उमटविण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याने ‘मराठी वृत्तपत्रांनी’ विशेष कौतुक केले, अनेकांनी पत्रांतून अभिप्राय व्यक्त केले, यात मोडीचं वेड असणारे होते, तसेच ज्यांना मोडी येत नाही असेही होते.मोडीप्रेमी राजीव म्हसवडे यांनी त्यांच्या http://marathimodi.tripod.com या वेबसाईटवर हा फॉन्ट उपलब्धदेखील करून दिला.
यामधे काही प्रतिक्रीया अशाही होत्या ज्यांची मला अजूनही कीव येते, या लोकांचा प्रश्न हा होता की या प्रोजेक्टमधून तुला आर्थिक फायदा काय झाला ? आणि आर्थिक फायदा नसेल तर संगणकावर काही डेव्हलप करण्यात काय अर्थ ?
एक उत्तर मात्र त्यावेळी मला माहित नव्हतं,नाहितर नक्कीच दिलं असतं,
“प्रश्न चांगला आहे !”

सोमेश,
मोडी लिपी संगणकावर उतरवून सरस्वतीच्या मराठीतील समस्त उपासकांसाठी आपण एक चांगली सोय करून दिलेली आहे. ‘हेमाद्रि’ हे नाव सुरेखच आहे. ह्या लिपीच्या मागची पार्श्वभूमी इथे दिल्याबद्दल आपले आभार!
फार छान.
keep it up
Shailesh,
Thanks for your comments, BTW I developed this in year 2001.
That is really excellent work, Somesh!
Hi Somesh,
Really nice work & nice write up too.
Tula “Changale Prashna” vicharnare aaju bajula bharpur bhetatil, pan tula mahit aahe kay karayache te
सोमेश,
खुपच छान.
सोमेश, तुझ म्हणन पटतः, पण प्रत्येक initiative ला पैसा हा हवाच. त्या विचारानः, आज तरी य्हा font ला commercialize करुन, त्या पैश्यानि मराठी सन्गणक क्षेत्राला पुढे ढकलाव.
Nikhil,
Kahi kam AanandaSathi karayachi asatat, kahi kam vitamin M sathi,
Since you have taken so much effort to develop it, you should definitely get the credit. You should distribute it under open-source GPL license. (As you might know, its not a license that just puts work in public-domain, but also requires that those who modify it should also put it under the same license.)
I will definitely try to use the font.
- milind
also, what is the encoding ? do you have a chart describing keyboard mapping ?
Thanks in advance.
milind
Milindji,
After writting this post and getting comments on this I think I have to go for a nice documentation,I will be back with it .. thanks for comments
http://blog.guruvision.in/blog/index.php?paged=2
link not active
you are just unbelivable.
the work you had done is veeeeeeery amezing.
Good work. Hope Unicode will notice Modi script in future.
Rahul
Somesh,
heartily congrats and sincere thanks for your work !
keep it up!!
Sincerely thanks for such a great work, to make a font of modi script! amezing!!!
kautukaspad prayatn aahe .shubhecha.
आंतरजालकावर मुशाफिरी करताना अचानक तुमचे मोडी फॉंट हाती लागले, आणि त्यावरून शोधत-शोधत इथपर्यंत आलो.
सर्वप्रथम तुमचे हार्दिक अभिनंदन. (जरा उशीरच झाला आहे, पण “देर आए, दुरुस्त आए..!”)
मला एकच विनंती करायची आहे – या मोडी फॉंटच्या कीबोर्डचा नकाशा (अथवा ट्रान्स्लिटरेशन स्कीम) आपण उपलब्ध करून दिलीत तर बरं होईल!
पुन्हा एकदा धन्यवाद!
आपला ,
आदित्य पानसे
thank you very much,
i am working on maratha navy, and i was wondering about how to put modi script online, and next thing i know, google gave me this page.
thank you again.
Namaskar !
Mi geli anek v’arshe tumhi tayaar kele moDi fonts vaap’arat aahe. Fots tayaar kelya baddal anek anek dhannyavaad.
he t’ar tumhalahi dnyat aahe ki ashi anek aksar’a aaNi jodakshar’a aahet ki je adyaap ya font maddhye naahit. majhya kaDe font creator aahe. p’aN te kasey vaapraaiche hey mala Thaauk naahi. TUmhi j’ar mala saangu shaklaat t’ar urvarit akshar’a aaNi jodakshar’a tayaar karnyaas mi sahaaiya kareen.
Revival of modi font is very essencial. It is our asset. My mother aged 75 knows modi. You are doing very good job. My best wishes!
Hello,
Nice work. Can you tell me how I can get documents in modi translated to english or marathi or any professional translators. I am ready to pay for the same.
Yours,
Vijay Pawar
093241 54307
मला मोडी लिपीची आवड आहे. 10 वर्षांपूर्वी मी मोडी लिपी शिकलो होतो( ‘केशव भिकाजी ढवळे’ प्रकाशनाच्या मोडी लिपी शिकण्यासाठी असलेल्या पुस्तकांवरून !). मला ती प्राथमिक स्वरूपाचीच येते.
आपला मोडीचा टंक मी ४ वर्षांपूर्वी आंतरजालावरून Download करून घेतला होता. आपणच तो टंक बनविला होता हे कळून आनंद झाला. आपल्याला धन्यवाद !
आपल्याला एक विनंती आहे. आपण संगणक प्रणालीच्याच क्षेत्रात आहात.
सध्या युनिकोडचे दिवस आहेत. मोडी लिपीच्या अक्षरांचे वळण हे पुढच्या-मागच्या अक्षरांनुसार बदलते. आपल्या पूर्वीच्या टंकात बालबोधप्रमाणेच वर्णांसाठी रचना होती. त्यामुळे प्रत्यक्षात लिहिल्या जाणार्या व टंकाद्वारे मुद्रीत करता येणार्या अक्षरांमध्ये फरक होता.
युनिकोडमध्ये देवनागरीसाठी असणार्या Glyphs ची संख्या विस्तॄत असल्याने आपण त्याच कोडवर मोडी लिपीसाठी Glyphs ची रचना करू शकता. (संगणक-प्रणाली हे माझे क्षेत्र नाही, तेव्हा माझ्या शब्द, संकल्पनांमध्ये त्रुटी असू शकते, पण माझ्या म्हणण्याचा भावार्थ
आपल्याला कळलाच असेल.)
पुन्हा एकदा, धन्यवाद !
[...] तयार केला यावर मी गुरूव्हिजनवरील ‘मोडी लिपी फॉन्ट‘ या लेखात लिहिले आहे. (मोडी लिपी [...]
सोमेश, सर्वप्रथम मोडी लिपी फॉन्ट उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. फॉन्टला हेमाद्री हे अतिशय समर्पक नाव दिलं आहे. ’एसबीडी’ यांच्याप्रमाणे मीदेखील केशव भिकाजी ढवळे’ प्रकाशनाच्या पुस्तकांद्वारे मोडी शिकत होते. फॉन्ट डाऊनलोड केली आहे, आता वापरून पाहिन. तुमच्या मोडी लिपी फॉन्ट: मदतीचे आवाहन या लेखावरून इथे आले. तिथेही कमेंट पोस्ट केली आहे.
माझ्या आजोबाचे स्वप्न होते की मी मोडी शिकावी. कारण त्यांचे मोडीतील लिखाण अतिशय सुंदर होते. ते बरेचदा पत्रही मोडीतच लिहित असत. काळाच्या ओघात माझ्याकडे त्यांनी लिहिलेले काहीही शिल्लक नाही. पण तुम्ही तयार केलेला मोडीचा फॉन्ट पाहत असताना माझे डोळे आजोबांच्या आठवणीने पाणावले. मी आता निश्चितच चांगली मोडी शिकू शकेल. आपले शतशः आभार….
मराठेशाहीची कागदपत्रे मोडी लिपीत आहेत. ती संगणकावर येऊ शकतात हे कळल्याने आनेद झाला. आतापर्यंत हा इतिहास वाचण्यासाठी पूर्वग्रहदूषित तज्ज्ञांची असलेली आवश्यकता आपण दूर केलीत. धन्यवाद.
Visit these 2 links –
1. To see the collections for MoDi documents.
http://www.orkut.co.in/Main#Album?uid=7652664266774351743&aid=1207640035
2. To stay in touch with MoDi scriot information.
http://www.orkut.co.in/Main#Community?cmm=20726090
It’s time for those in power, to learn from the wise words of the human character, in Jurasick Park…!
Please send name of book on Modee
books ahet ka
This is the best way to give live to the modi spell. Due to this this spell become familier and distribute the overall who would like to read the ancient histrorical papers.
Thanks & Regards
Gajanan
फारच छान. पण याचा की बोर्ड नाही मिळाला तर वापरायचा कसावाहे कृपया सांगावे.
जयंत कुलकर्णी.
modi cha font mhantlyawar ekdam bhari watle.
kharach khupach mast. aata mi mazya modi chya group madhye ha font dein.
pan problem fakt ekach aahe ki ha type kasa karaycha?
pan thik aahe mi type karat karat lihun key board tayar karnyacha prayatna karen.
punha ekada dhanyawad. thank you.
mala modi lipi shikshnasathi margadarshan have asalyas konte pustak vaaparave