आकीतीच्या मुहूर्तावर काहीतरी लिहीलं पाहीजे म्हणून हे काहीतरी ( कि काहितरिच काय ? ) लिहितोय. खरं तर मला रोज रोजनिशी लिहीणारांचं फारच अप्रूप वाटत आणि त्यात मराठीत टंकलेखन करत म्हणजे तर ! तसं लिहायचच म्हटलं तर काहीतरी लिहिता येतं त्याचं काही नाही , हो पण लिहायचं काय ? जे माहीत आहे ते लिहायचं की जे माहीत नाही ते लिहायचं ? जे माहीत असतं त्याच्या सीमा जे माहीत नाही त्यापर्यंत मर्यादित असतात आणि जे माहीत नसंत त्याला ‘माहीत’ असलेल्याची वेष्टणं असतात. म्हणजे पहा की तुम्हाला एखादी गोष्टीबद्दल काहीच माहीत नाही असं तुम्ही म्हणालात तरी तुम्हाला ” काहीच माहीत नाही ” हे माहीत असतेच ना ! आणि तुम्हाला जर एखाद्या गोष्टीबद्दल सर्वकाही माहित असले तरी “काय माहीत नाही” हे माहीत नसतेच !!
एकंदर काय आजच्या मुहूर्तावर मी माहित असलेल्या आणि नसलेल्या दोन्ही गोष्टीबद्दल बरंच काहितरी लिहिले , हे नक्की !!
[ ' काहीतरी या विषयावर काहीतरी लिही' या शिरीष सरांच्या सुचनेला अनुसरून ... ]

baryach divasani kahi tari vachal
ha ha ha
काहितरी विषयावर लिहील्याबद्दल काहितरी कॉमेंट केलेतर काहितरी अर्थबोध होईल का?
काहितरी करावंसं वाटलं म्हणून तुझे सर्व लिखाण पुन्हा एकदा न्याहाळत इतःपर आलो तर काहीतरी टिप्पणी टाकावी म्हणून लिहिलेल्या वाक्यात किती शब्द आहेत हे आता मोजतोय…