[ मातृदिन विशेष: एक खंत, जी तुमच्या माझ्या सर्वांच्या मनात असते , पण आपण कधीच बोलून दाखवत नाही. ]
‘ काय आई
तू कशी आहेस ?’
कधी मी विचारलंच नाही.
तिर्थक्षेत्र ..
.. माझ्या घरातलं
कधी मी पाहिलंच नाही.
घर शुद्ध करणारी गंगा ..
पदतीर्थ या गंगेचं ..
कधी मी घेतलं का ?
माझ्यासाठी झिजणारं चंदन ..
रोज कपाळी ..
कधी मी लावलं का ?
तिनंच तर शिकवलं सगळं
पण तिचं शिष्यत्त्व
कधी मी मानलं का ?
आमची आनंददात्री,
दु:ख तिचं
कधी मी जाणलंच नाही
आतापर्यंतच जगणं
.. छे
खरतरं ते जगणंच नाही ..
-एप्रिल २०००

रामदास स्वामींच्याच शब्दात सांगायचे झाले तर ….
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी… (मला वाटते हे अनुभूती सूचक उद्गार स्वामीजींनी त्यांच्या मातृवियोगाने काढले… काही चुकले असल्यास क्षमस्व…)
तेव्हा श्रीमंत हो उठा ऽऽऽऽऽ आणि कामाला लागा…
khup manala chatka laun geli
[...] http://blog.guruvision.in/?p=72 [...]