कॉस्ट कटींग !

वेळ संध्याकाळी साडेसहाची. एका मित्राने जाता जाता अनाहूतपणे सल्ला दिला की आज मंगळवार आहे , तुला ‘ चिप डिल ‘ मधे केस कापून मिळतील.
गेली दिडमहिन्यापासून मी केस कापलेले नव्हते, मला केस कापायचेच होते म्हणून मी भल्या उत्साहात निघालो.’ चिप डिल’ पेक्षा मी आज पहिल्यांदाच अमेरिकेत केस कापतोय हाच उत्साह दांडगा होता. सांगितलेल्या दुकानासमोर व्यवस्थित जाऊन पोचलो.

मी केशकर्तनालयात गेलो परंतु आत जाताच माझा थोडासा अपेक्षाभंग झाला. कर्‍हेकाठचं ‘ केशकर्तनालय’ म्हणजे शटरच्या आत डोकावलं की ऐकू येणारा कात्र्यांचा कचकचाट, खुर्चीवर बसलेली चार सहा गिर्‍हाईकं, त्यातंल्या ‘म्हहत्वाच्या’ माणसाची केसं कापणारे मालकं आणि
बाकीच्यांच्या मुंड्यावर आणि गालांवर ‘हात’ साफ करणारे ट्रेनिज ! या सगळ्यांच्या साथीला चालू असणारा टिव्ही किंवा रेडिओ.
कोणी आरश्यात बघतयं, कोणी हात वर करून ‘बगला’ साफ करून घेतयं, कोणी मिशीला पीळ मारतयं, तर कोणी ‘मालक घ्या तंबाखू’ म्हणतं हात पुढे केलेला तर कोणी फुस-फुस करत डोक्यावर पाणी मारून केस बसवतय.
यात मधेच रंगलेली गप्पांची मैफल. या गप्पांमधे कालची क्रिकेट मॅच असते, गल्ली ते दिल्ली राजकारण असतं, भैरोबा – सोपानकाकाच्या देवळातलं किर्तन असतं आणि तितक्याच उत्साहात कुस्त्या – तमाशाचा फड – आणि फडाबरोबरच ( तमशातल्या आणि तमाशबहेरच्याही )’बाया’ही असतात.

इथे मात्र चित्र थोडंस वेगळं होतं, दारातचं एका हसर्‍या चेहर्‍याच्या गौरवर्णी तरूणीने स्वागत केले. तिने ‘मी तुला काही मदत करू शकते का ?’ अशा आशयाचा इंग्रजीतून प्रश्न केला. ‘मी काय इथे अंधनिधी्ची मदत मागायला आलोय का ?’ – माझा हा प्रश्न अर्थात मराठीत आणि मनातल्या मनातच हे सांगायला नको.
मला केस कापायचेत हे सांगितल्यानंतर तिने माझे नाव तिच्या रजिस्टर मधे लिहून माझे ‘बुकींग’ केले आणि मला सात वाजताची ‘अपॉईंटमेंट’ दिली. तोपर्यंत वेळ काढायला जवळच रहाणार्‍या एका मित्राच्या घरी गेलो.

पुन्हा सात वाजता गेल्यावर दोन चार मिनिटांमधे माझा नंबर !

पुन्हा त्याच हसर्‍या सुंदर चेहर्‍याने माझे स्वागत केले आणी खुर्चीवर बसायला सांगितलं. आणि एकच प्रश्न केला ‘तुझे केस किती कापू व कसे कापू ?’ या वेळी मात्र मी गप्प झालो. माझा कर्‍हेकाठचा नापीत माझी केस कशी कापतो हे मी त्याला कधिच विचारलं नाही आणि त्यानेही मला ते कधी सांगितलं नाही. त्यामुले मला हे त्या गोर्‍या-न्हावी-बाईंना सांगता येईना ! गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदाच मी ‘माझ्या’ न्हाव्याकडे सोडून दुसरीकडे केस कापत होतो त्याचा फटका मला बसला !

केशकर्तन आणि तेही चक्क एका गोर्‍या मुलीकडून, त्यामुळे तिला हे सगळं इंग्लिशमधे सांगता सांगता माझ्या मात्र नाकी नऊ आले. या बाईंनी केस कापायला सुरुवात केल्यावर त्या एकाच जागी उभ्या राहिल्या आणि माझ्यासहीत खुर्चीला गोलगोल फिरवलं.आतापर्यंत आपण बसायचे आणि कापाणारा फिरतो हे पाहिले होते पण हा अनुभव मला नविन होता. आणि तितकाच .x.x.x.

केस कापता कापता बाईंनी साधारण चौकशी केली, कुठून आला , काम कुठे करतो. एवढी माहिती काढून घेतली. नंतरच्या प्रश्नावर मात्र उडालोच, बाईंनी मिश्कीलपणे विचारलं ‘मग आज रात्री काय विशेष वाटतं’. मी फक्‍त हसलो. तिही हसली.
काय गंमत आहे ना, न्हाव्याचे दुकान मग ते कर्‍हेकाठी असो की मिसिसीपी काठी केस कापता कापता समोरच्या खाली मान घातलेल्या गिर्‍हाईकाकडून ‘आतलं’ काढण्याचा मिश्कीलपणा मात्र एकच !

बाईंनी थोडी घाबरत घाबरत केस कापण्याचं कामं केलं. शेवटी कशीबशी डोई करून घेतल्यावर बाईनी खात्त्री केली कि मला हवी तशी का्पली गेलीत की नाही ? यानंतर तिने सांगीतलं “अरे याला तर आम्ही नंबर ४ म्हणतो !”

त्यांनी ‘अल-राईट, हीअर यू गो !’ (’छान, झालं तुझं आता !’) असं म्हणताच मी ओलखलं की चला आता , बिल द्यायची वेळ झाली. डोकं एकंदर बरं दिसतं होतं. यावेळी मात्र मी मनापासून ‘Thank you !’ म्हटलो. मला आठवतयं मागच्या वेळी अमेरिकेहून सासवडला गेल्यावर तिथे केस कापल्यावर त्याला जेव्हा मी ‘Thank you’ म्हटलो होतो , तेव्हा ‘काय बावळट्टं आहे !’ अशा नजरेनी तिथली मंडळी माझ्याकडे पहात होती, त्यानंतर मी मात्र कधिच त्याला असं म्हटल्याचं आठवत नाही.

आम्ही दोघेही काउंटरवर गेलो, त्या गौरांगणेनी माझ्या हातात एक कार्ड दिलं, त्यावर माझा हेअर कट नंबर व बाकिचे ‘ब्रिफ’ लिहिले.पुढील वेळी मी ते कार्ड दाखवले की तेथील कुणालाही माझी केस-हिस्टरि समजेल असे तिने सांगितले.

माझे एकूण बिल $12.84 झाले. इथे केशकर्तनालयात टिप देण्याची पद्धत आहे. केशकर्तनालयातच नव्हे तर कोणाताही कमी पगाराचा सेवा देणारा जॉब असेल तर टिप देतातच.कधी कधी सामाजिक संकेत पाळावे लागतात ! टीप धरून एकूण $14.84. माझ्या ‘भारतीय मनाने’ लगेचच त्याचे Rs.600 असं समिकरण मांडले देखिल.

कर्‍हेकाठी सहाशे रुपयात मी, मंदार, आप्पा तिघांनिही सहा महिने कटींग केली असती आणि उर्लेल्या पैशात श्री साठी शांपू आणला असता ! (श्री आमच्या कुत्र्याचं नाव)

कार्ड स्वाईप केलं आणि मी घरचा रस्ता धरला.

आता तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की जर एका कटींगसाठी एवढे पैसे लागले असतील तर या लेखाचे नाव ‘कॉस्ट कटींग’ असे का ? कारण मी ज्या दुकानात केस कापायला गेलो होतो त्या दुकानचे नाव होते ‘ कॉस्ट कटर्स’ आणि तिथे केलेली कटींग म्हणजे … कॉस्ट कटींग !

[ टिप : या लेखामधे 'न्हावी' हा शब्द केशकर्तन व्यवसाय-वाचक म्हणून वापरला आहे.]

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
18 Responses
  1. Dinesh Kumthekar says:

    Thanks,
    Very good & informative article..
    I hv already planned to hv hair cut of October in the US
    This is decided before your reading your article.
    In Kwt too, cutting costs Rs 200/-
    Bye

  2. Ajit Dangal says:

    Good Experience – There are few things one can teach others come by experience ….Number is important concept …;)

  3. atul says:

    Nice Experiance. Soon or later thisa service we can also see in saswad also. India will become 3rd power soon

  4. Rahul Deshpande says:

    खुप आवडल सोमेश… झक्कास…!!

  5. Vivek says:

    Somya,
    yes mazyasathi tu somyach ahes kutha hi ja…
    mi ankhi saswad chya mitranna shaletlya navanech hak marto…
    Somya, Appya, Manya, Nitya…

    anyways …great to read that…
    even i paid bit more when i was there…
    ;-)

  6. Krishna says:

    the way u described….its kool dude…

    I really like that, ….Asa wattatay me swattah kes kaapoon aloy…………

  7. says:

    I used to cut few fellow students’ hair foo-कट when in Amrica. Only one condition, they clean up their own mess after I am done with their head!

    I had learned to cut hair looking at भारतीय न्हावी over the years since childhood. and my paying attention there definitely helped when in Amrica.

    Many who came to visit were really happy with haircuts. Others probably did not *pay* attention :-)

    Maybe you can try your hand if you get a बळीचा बकरा…

    The question is not of saving money… rather of what you can do with the simple scissors and your own hands… when somebody is willing give you a head start!

  8. Vivek Chitale says:

    This is one of the most intresting atrical i have read in quite some time. good job:)

  9. Vikram says:

    somesh, ekdam zakas mandale aahe… aani te ekdam khare aahe… keep posting such good articles….

  10. Sandesh Kadam says:

    Nice article somesh.
    I have also same fellingd.And it is really a nice cost cutting.awesome

  11. Kamalkishor Garg says:

    Hi Somesh,

    Excellent article….Frankly until now I was not much impress with your other writings but this time you proved me wrong…it’s one of the best blog I have read in past time.I do lots of blog reading,but mostly related to technology…but I read your blog regularly…Feels very good for you…Keep the spirit up….do keep writing…all the best.

  12. Pratap says:

    Ekadam Masta ….Exprience Haaaa….

  13. Sudip mokashi says:

    Shabdach naahit lihayla………..
    Khup khup mast article hote te kharach agdi manapasun avadle…. khaas karun he….
    कर्‍हेकाठी सहाशे रुपयात मी, मंदार, आप्पा तिघांनिही सहा महिने कटींग केली असती आणि उर्लेल्या पैशात श्री साठी शांपू आणला असता ! (श्री आमच्या कुत्र्याचं नाव)
    Khup mast……….Tu Writer honaar nakkich……

  14. smita jamadagni says:

    lekh vachala. likhanachi shaili chan ahe. agadi nemke kelele varnan bhavale. sidhhast lekhakache likhan vachlyasarkhe vatte.

  15. Ashok R. Ghuge & Alka Ashok Ghuge says:

    kiti chhaan mhanun saangu ! Somesh, tu asaach lihit raha. chhapai karun tyachi prat swatahaa jawal vyawastit baeending karun thewayala visaru nakos. Taseh ekhada sampadak bhawishyat gath aani sangrah cchhapun ghe. nav aani kirti nakkich hoeel. Tuze uspoort Likhan pharach cchhan tharale aahe. Jiyo mere Lal, Jiyo !!!!!!!

  16. Ashok R. Ghuge & Alka Ashok Ghuge says:

    Marathi kana, maatra, velanti, ookar, raswa, dirgha, jodakshar, eetyadichi jaroor jaroor kalaji ghet jaa.

    Likhaan (Blogg) Marathi bhashetun wachatan-na khup-khup tras hoto !

    Aamachya vinanti kade jara laksha de !!!!!!
    Wachanat adhik godi waadhel, Nakkich.
    Prerupi sallaa aahe, kalaji ghe. Sadhya Mumbaeet Marathi bhashewarun kevhade waadal chalale aahe. Khare tar konatyahi bhashechya drushtikonatun ase shuddha lihine nakkich changle aahe. kay, kase!?

  17. Ajay bidwe says:

    At least you had a provision to tell her in English that how you would like to get it cut. Here in germany, first time I remember, I guess I had no clue, what she was asking, and I she had no imagination what I was telling. It was funny.

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>