सुख दुसऱ्यांना द्यावे, दुःख मनातच ठेवावे!

असं कितीतरी संतांनी म्हटले आहे पण आपण नेमकं उलट करतो. सुखाचा उपभोग आपण आणि आपल्या जवळच्या माणसांसाठी घेतो. दुःख झाले की कितीतरी जणांना सांगत बसतो, तक्रार करत बसतो, नशिबाला दोष देत बसतो – हे किती योग्य आहे? सुख वाटल्याने संपत नाही. दुःखही संपत नाही. संपते ते केवळ ज्ञान झाल्यामुळे! जोपर्यंत दुःखाचा, वेदनेचा निचरा करायची आपल्याला सवय लागत नाही, तोपर्यंत दुःख मनात राहणारच आणि ते त्रास देणारच, शेवटी शरीर आणि मानस रोगांच्या स्वरुपात व्यक्त होणारच!

हे अगदी खरे आहे, की मनाचा क्षोभ झाला की तो कुठेतरी मोकळा करावासा वाटतो. पण हा निर्जीव वस्तुपाशी नाही मोकळा होत! आपल्या जिवाभावाचे कुणीतरी लागते. कुणीही माणूस आपलं मन १००% दुसऱ्याकडे मोकळं करु शकत नाही. हे मोकळे होणे , फक्त आपल्या मनाशीच बोलणे हे शंभर टक्के मोकळे होणे असू शकते.. आपल्या मनातला कचरा आपणच बाहेर काढायचा नाही तर कुणी काढायचा? दुसरा कोणी येऊन तुमच्या घरातला कचरा काढेल का? काढला तरी त्याचे मूल्य द्यावे लागेल, तेच काम स्वतः केले तर? आपल्या मनातल्या दोषांचा निचरा आपण स्वताःच करायला शिकलो तर? येणारा प्रत्येक विचार स्थिर कसा होईल हे पाहिले तर किती आनंद निर्माण होईल.

स्वच्छ मनाचा आरसा, स्वच्छ निरोगी आयुष्य!!

…प्रसन्नतेच्या पाऊलवाटा

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
2 Responses
  1. Sanjay Dhas says:

    mala tar vatate ki dukhkhache khare karan samajlyavar trasach jast hoto karan baryachda ti aaplya javalche vyakti aste ani ashaveli dukh manatach thevane changale. nantar punha………

  2. sukh java evdhe dukkh parvtaevdhe

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>