Tag-Archive for » america «

Nothing is फ्री इन अमेरिका !

Subway logoSubway च्या कॅश काऊंटरवर पुढे सरकत-सरकत शेवटी एकदाचा माझा नंबर आला, मी ६ इंची व्हेज सॅन्डविच सांगितलं होतं, सोबत ब्रॅकोली-चीज़ सूप आणि एक कोल्ड्रींक असं सांगितल्यावर समोरच्या अमेरिकन मावशींनी माझं कार्ड स्वाईप करून परत दिलं, माझ्या ट्रेमधे सूपचा बाऊल ठेवला आणि माझ्याकडे एक छोटा पेला दिला.
दिलेला ट्रे बाकीचे मित्र जिथे बसले होते तिथे ठेवायला गेल्यावर माझ्या हे लक्षात आलं की त्या मावशीनी मला दिलेला पेला पाण्यासाठी आहे, को्ल्ड्रींकसाठी नाही ! इथे रेस्टॉरंतमधे कोल्ड्रींक, पाणी इ. एकाच वेन्डींग मशीनवर serve होते फक्‍त कॅश काऊंटरवरून पाणी आणि कोल्ड्रींकसाठी वेगवेगळ्या आकाराचे पेले दिले जातात.

आज मला ‘लेमोनेड’ प्यायचंच आहे हे मी ऑफिसमधून निघतानाच ठरवलं होतं त्यामुळे मी तो ट्रे जसाच्या तसा घेऊन परत कॅश काऊंटरवर गेलो.

“मी कोल्ड्रिंक सांगितलं होतं, तुम्ही मला पाण्याचा पेला दिलात”, थोड्याश्या हसर्‍या चेहर्‍याने मी माझी तक्रार सांगितली.

“Ohh, am extremely sorry, but I have not charged it” असं म्हणत त्या बाईंनी एक कोल्ड्रीकसाठी असतो तो पेला माझ्या हातात दिला. आता, त्यांनी याचे पैसे सेंटस :) घेतले नाहित म्हटल्यावर मी कार्ड पुन्हा देउ केल तेव्हा,

“Don’t worry, that comes to me, that’s my fault” असं सांगून उरलेलं बिल घ्यायला तिने नकार दिला.

Subway मधून मला मोफत कोल्ड्रींक मिळले याचे मला फारच आश्चर्य वाटले कारण अमेरिकेत आल्यावर Nothing is free in America हे वाक्य अनेकवेळा माझ्या कानावर पडले आहे , आणि याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे निवडणूंकातील प्रचारसभा. इथे उमेदवारांच्या प्रचारसभेलादेखील तिकीट काढून जावे लागते ! :)

हे सर्व मी माझ्या एका अमेरिकन सहकार्‍यास सांगितले व हेही विचारले की अमेरी्केत जर फुकट काहीच मिळत नाही तर हे कसे ? आणि त्यावर त्याने दिलेल्या उत्तराने झालेल्या गोष्टीची दुसरी बाजू माझ्यासमोर उघड केली,

Yes Somesh, nothing is free in America, even her small mistake also !